शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

दूधपावडर अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा, महादेव जानकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 02:10 IST

केंद्राकडे पावडर निर्यातीवर २५ टक्के अनुदान देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी १० टक्के अनुदानासाठी संमती दिली; मात्र आणखी अनुदान मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली.

बारामती : केंद्राकडे पावडर निर्यातीवर २५ टक्के अनुदान देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी १० टक्के अनुदानासाठी संमती दिली; मात्र आणखी अनुदान मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली.बारामती येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री जानकर म्हणाले, की जागतिक बाजारात दूध पावडरचे दर पडलेत हे खर आहे. ही परिस्थिती लगेच पूर्ववत होणार नाही. राज्य सरकार आजही आरेच्या माध्यमातून २७ रुपये दूधदर देत आहे. मात्र, आमची संकलन केंद्रे कमी आहेत. दुधाचे धोरण सध्या नाही. ते बनविण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. ७०-३०चा कायदा केल्यानंतर यावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.आघाडी सरकारच्या काळात सहकाराची चळवळ मोडीत काढण्यासाठी सरकाचे धोरण मोडीत काढण्यासाठी खासगीकरणाला चालना देण्यात आली. शेतकऱ्यांनी खासगी दूध संघांकडून पैसे जादा मिळत असल्याने दूध देण्याची भूमिका घेतली. सरकार २७ रुपये दर देत आहे, तर खासगी दूध संघ १६ रुपये दर देत आहेत. साखर सम्राटापेक्षा दूध सम्राटांची लॉबी बनली आहे. ७९ अ च्या कारवाईसंदर्भात दूध संघांना नोटीस देण्याचे धाडस प्रथमच दाखविले. दुधाबद्दल पैसे जास्त देण्याची भूमिका घेणारे घेणारे पहिलेच राज्य आहे. दुग्ध भागाकडे १३ हजार ५०० अधिकारी होते. ते केवळ ३५० उरले आहेत. त्यामुळे सर्व संघांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. उद्योजकांना यामध्ये सहभागी करून ‘बांधा, वापरा, हस्तांतर करा’ धोरण राबविण्यात येत आहे.राज्य सरकारची ७८ हजार टन पावडर पडून आहे. यामध्ये खासगी दूध संघाची पावडर वेगळी आहे. जागतिक बाजारात दूध पावडरचे दर ४६ टक्के घसरले आहेत. त्यामुळे गरोदर माता, आश्रमशाळा, शालेय पोषण आहार, आरोग्य केंद्रामधून अंडी, दूध दिल्यास पावडरचा मोठा प्रश्न मार्गी लागेल. येणाºया ‘कॅबिनेट’मध्ये निर्णय होणार आहे.गेल्या दीड महिन्यात दुधाची भेसळ रोखण्यासाठी धाडी अमाप टाकल्या. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. बारामती, फलटण, माळशिरस येथे धाडी टाकल्या. त्यामुळे राज्यात ६ लाख भेसळयुक्त दुधावर बंदी आली. दुधभेसळ रोखण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार आहे. हा कायदा आल्यानंतर खागसी दूध धंद्यांच्या दूधभेसळीला आळा बसेल. १ कोटी ३० लिटर दुधाचे दररोज उत्पादन होत आहे. राज्याचा पशुसंवर्धन विभाग देशात प्रथम क्रमांकावर आहे, असे जानकर म्हणाले....हे बारामतीकरांना चांगलं समजतंपुण्यातील हल्लाबोल समारोपाप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुणेरी पगडी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून हद्दपार करून यापुढे फुले पगडी वापरण्याचे आवाहन केले. याबाबत या वेळी जानकर म्हणाले, की महात्मा फुले हे आमचे आयडॉल आहेत. मात्र, त्यांच्या नावाचा वापर कधी करायचा आणि कधी नाही करायचा, हे बारामतीकरांना चांगलं समजतं.बारामतीकरांना कोणती पगडी कधीवापरायची, हे चांगलं माहीत असलं, तरी जनतेलाही तुम्हाला कोणती पगडी घालायची, हे चांगलं माहीत आहे. खºया अर्थाने जातीचे विष पेरण्याचे काम हे राष्ट्रवादीनेच केले आहे, असा टोला जानकर यांनी ज्येष्ठ नेते पवार यांना लगावला.बारामती लोकसभा निवडणुकीत महादेव जानकरबारामती लोकसभा निवडणूक आपण लढवणार का आणि मागील वेळेएवढा प्रतिसाद आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री महादेव जानकर यांना विचारला. यावर जानकर यांनी, ‘‘मी तुम्हाला सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मी निवडूनच येणार आहे,’’ असे उत्तर दिले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून मंत्री जानकर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :milkदूधMahadev Jankarमहादेव जानकरPuneपुणे