शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंगीत भारतीय संगीताचा ठेवा : पंडित अमरेंद्र धनेश्वर; रसिकांना लोकसंगीताची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 12:28 IST

प्रत्येक प्रांतातील रूढी, परंपरा आणि चालीरीतींचा मेळ असलेले लोकसंगीत हा भारतीय संगीताचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. लोकसंगीताने हिंदी चित्रपट संगीताला देखील मोठे योगदान दिले आहे, असे मत ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अमरेंद्र धनेश्वर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे ‘चढ गयो पापी बिच्छुवा’लोकसंगीत ही त्या त्या प्रांताची ओळख, सामूहिक वादन, गायन आणि नृत्य हे लोकसंगीताचे सूत्र

पुणे : प्रत्येक प्रांतातील रूढी, परंपरा आणि चालीरीतींचा मेळ असलेले लोकसंगीत हा भारतीय संगीताचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. लोकसंगीताने हिंदी चित्रपट संगीताला देखील मोठे योगदान दिले आहे, असे मत ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अमरेंद्र धनेश्वर यांनी व्यक्त केले. भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘चढ गयो पापी बिच्छुवा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदी आणि मराठी चित्रपटातील लोकसंगीतावर आधारित हा विशेष कार्यक्रम अमरेंद्र धनेश्वर यांनी प्रात्यक्षिक आणि विश्लेषणात्मक विवेचनाद्वारे सादर केला. या वेळी भारतीय विद्याभवनचे संचालक प्रा. नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते.   धनेश्वर म्हणाले, ‘लोकसंगीत ही त्या त्या प्रांताची ओळख असते. सामूहिक वादन, गायन आणि नृत्य हे लोकसंगीताचे सूत्र आहे. समूहाला एका धाग्यात बांधून ठेवण्याची ताकद लोकसंगीतामध्ये असते. पारंपरिक वाद्यांचा वापर होत असल्यामुळे आणि त्यातील शब्द हे रोजच्या जगण्याशी संबंधित असल्यामुळे लोकसंगीत मनाला भिडते.’ धनेश्वर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटातील लोकसंगीतावर आधारित गीते सादर करून त्याचे विवेचन केले. भैरव रागातील लोकगीताचा अंश सादर करून त्यांनी या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्यानंतर भूप रागातील बंदिश, पिलू रागातील मुखडा आणि सारंग रागातील तरंग सादर करून रसिकांची दाद मिळवली. तसेच महाराष्ट्रातील ओवी, गुजरातमधील गरबा, पंजाबमधील भांगडा असे लोकसंगीताचे अनेक प्रकार हिंदी, मराठी तसेच त्या त्या प्रांतिक भाषांच्या चित्रपटात समाविष्ट झाल्यामुळे या लोकसंगीत प्रकारांना एक व्यापक व्यासपीठ मिळाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. अरविंद परांजपे (तबला) आणि उमा जठार (व्हायोलिन) यांनी सुरेल साथसंगत केली. 

टॅग्स :Puneपुणे