शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! तमाशाच्या फडात घडला फौजदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 18:41 IST

तमाशामध्ये डान्सर, वाद्य काम आणि सोंगाड्या या भूमिका करत स्पर्धा परीक्षेची तयारी.....

ठळक मुद्देतमाशा कलावंत दिनेश सकट याची यशोगाथा , राहूट्यात राहून केला अभ्यासआईची इच्छा असल्याने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिनेशने राज्य आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु

टाकळी हाजी : घरात तमाशाची मोठी परंपरा. आजोबा राज्यातील नामवंत तमाशा कलावंत तर आई मोठी नृत्यांगना.. राहूटीतच जन्म झाल्याने तमाशाचे संस्कार लहानपणापासूनच झाले. आपला मुलगा तमाशात न राहता मोठा अधिकारी व्हावा अशी तिची इच्छा असल्याने शिक्षणाची आवड जोपासत संविदणे येथील तमाशा कलावंत दिनेश मधूकर सकट हा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला असून फौजदार होऊन त्याने त्याच्या आईचे स्वप्न पूर्ण केले आहे.   संविदणे (ता.शिरूर) येथील तमाशा कलावंत युवकाची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली असून त्यांच्या निवडीने सर्वसामान्य माणसांमध्ये कलाकार झाला फौजदार अशीच चर्चा रंगली आहे. तमाशा कलावंत दिनेश सकट याचा जन्म तमाशाच्या राहुटीमध्येच झाला. दिनेशचे आजोबा राज्यातील मोठे तमाशा कलावंत. आईसुद्धा तमाशातील मोठी नृत्यांगना. लहाणपणापासून त्यांच्यावर तमाशाचे संस्कार झाले. मात्र, असे असतानाही त्यांने शिक्षणाची आवड जोपासली. त्यांच्या आईलाही आपला मुलगा या क्षेत्रात न राहता मोठा अधिकारी व्हावा असे वाटत असल्याने शिक्षणासाठी नेहमी त्यांनी दिनेशला प्रोत्साहन दिले. दिनेशने तमाशामध्ये डान्सर, वाद्य काम आणि सोंगाड्या या भुमिका करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. दिनेशची याची आई नंदा सकट या रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळात नृत्यांगना म्हणून काम करत असत. त्यांचा वारसा घेऊन दिनेश शाळेच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये रघुवीर खेडकर, दत्ता महाडिक पुणेकर, सर्जेराव जाधव या तमाशामध्ये काम करत होता. तमाशात काम करता करता त्याने पाबळ ( ता. शिरूर) येथे बी. कॉमपर्यतची पदवी मिळवली. पदवीपर्यंतचा दिनेशचा शिक्षणाचा प्रवास खडतर राहिला. त्यात त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले.२०१६ मध्ये आई नंदा यांचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटूंबावर मोठे संकट कोसळले. मात्र, तमाशामध्ये काम न करता आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा ही आईची इच्छा असल्याने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिनेशने राज्य आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना अतिशय बिकट परिस्थितीतून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिनेश उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक झाला. तसेच विशाल मोटे हा शेतकरी कुटुंबातील युवक असून नाजुक परिस्थितीवर मात करत मनाशी असलेले स्वप्न उराशी बाळगुन पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. सविंदणे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. संपूर्ण शिरूर तालुक्यातून दिनेश व विशाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तमाशा कलावंतांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही वेगळा आहे. आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा झालेला विकास तसेच राजाश्रय नसल्यामुळे आज तमाशाच्या राहूट्या तसेच फड ओस पडत आहे. या कलावंतांच्या नशीबी नेहमी उपेक्षेचे जीणे असताना दिनेशने मिळवलेले यश सर्वसामान्यांना प्रेरणा देणार आहे. ................... माझा जन्म तमाशात राहूट्यात झाला. आई आणि आजोबा मोठे तमाशा कलावंत होते. कलेची आवड जोपासत शिक्षणही पूर्ण केले. आईला मी नेहमी मोठा अधिकारी व्हावे असे वाटत होते. ती गेल्यानंतर तीचे स्वप्न मी पूर्ण करण्याचे ठरवले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत आणि राहूट्यात काम करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. आज ही परीक्षा पास झाल्याने खूप आनंद  होत आहे. - दिनेश सकट

टॅग्स :ShirurशिरुरPoliceपोलिसMPSC examएमपीएससी परीक्षा