शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सायकल चोरणाराच ठेवणार सायकलींवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 03:00 IST

लॉक तोडलेली सायकल घेऊन जाणाराच आता त्याच सायकलींचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सायकल शेअरिंग योजनेला तो तरुण आता मदत करीत असून त्याचे मित्रदेखील त्याच्यासोबत आले आहेत.

पुणे : लॉक तोडलेली सायकल घेऊन जाणाराच आता त्याच सायकलींचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सायकल शेअरिंग योजनेला तो तरुण आता मदत करीत असून त्याचे मित्रदेखील त्याच्यासोबत आले आहेत. त्यामुळे ही घटना सायकल शेअरिंग योजनेला बळ देणारी ठरत आहे.शहरात सायकल शेअरिंग योजना गेल्या वर्षी सुरू झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, काही ठिकाणी लहान मुले मात्र सायकलींच्या चोऱ्या करून तोडफोड करीत आहेत. सायकल कंपनीचे काही प्रतिनिधी सर्व शहरांत नजर ठेवून आहेत. या प्रतिनिधींना येरवड्यात एक १८ वर्षांचा तरुण लॉक नसलेली सायकल घेऊन जाताना दिसला. तेव्हा त्यांनी त्याला पकडले आणि पर्णकुटी पोलीस चौकीमध्ये पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दम दिल्यानंतर त्या तरुणाने ही सायकल कल्याणीनगर येथून आणल्याचे कबूल केले. यानंतर सायकल कंपनीकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु, त्या तरुणाविषयीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्याचा निर्णय सायकल कंपनीच्या प्रतिनिधीने घेतला. तो तरुण अपंग असून, एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. त्याची आई घरकाम करते. त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे. त्यामुळे घरात तो आणि आई राहतात. ही परिस्थिती जाणून घेतल्यानंतर त्या तरुणाला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच संबंधित तरुणाच्या आईने व मित्रांनीदेखील त्याच्यावर गुन्हा दाखल करू नये, अशी विनंती केली. कारण त्याच्या भविष्याचा प्रशन होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. परंतु, त्या तरुणाकडून यापुढे असे प्रकार होणार नाहीत, असे लिहून घेतले. तसेच त्या तरुणाने सायकल कंपनीला मदत करण्याचे आश्वासन दिले.येरवडा परिसरात कुठे कोण सायकली घेऊन जाते, कोण तोडफोड करतात, याविषयीची माहिती तो देणार आहे. तसेच नियमितपणे परिसरातील सायकलींचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणार आहे. तसेच त्याच्या या कामात त्याचे मित्रदेखील सहभागीझाले आहेत.शहरात सायकलींची तोडफोड किंवा लॉक तोडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तसेच जे तरुण आम्हाला सायकल शेअरिंग योजनेला मदत करतील, त्यांच्या परिसरातील सायकलींवर नजर ठेवतील, त्याबाबत माहिती देतील त्यांना आम्ही एक गुडी बॅग आणि महिनाभर सायकल चालविण्याचा पास देणार आहोत.- आदर्श केदारी,आॅपरेशन हेड, मोबाईक कंपनी

टॅग्स :Puneपुणे