- विशाल विकारी, लोणावळामावळात राष्ट्रीय महामार्गासह सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अनधिकृत भराव व बेकायदेशीर बांधकामे यांमुळेच मावळ तालुका शुक्रवारी पाण्याखाली गेला होता़लोणावळ्यापासून देहूरोडपर्यंत सर्वत्र रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात मातीचे व मुरमाचे भराव करून जागा रस्त्याच्या उंचीच्या करण्याचा सपाटा सुरू आहे़ हे करत असताना पावसाचे नैसर्गिक नाले व ओढे काही ठिकाणी बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी वळविण्यात आले आहेत. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचणी होत असून, मोठा पाऊस झाल्यास पाणी सर्रास रस्त्यावर येऊ लागले आहे़ शहरी भाग असो वा ग्रामीण भाग, मागील दशक-दीड दशकापासून मावळातील जमिनींना सोन्याचे भाव आल्याने अनेकांनी आलिशान बंगले बांधले आहेत़ ते बांधण्यास कोणाचा आक्षेप नाही. मात्र, हे बंगले बांधताना मोठ्या प्रमाणात भराव करण्यात येतो. यामुळे परिसरातील पाणी अडले जाणार नाही, याची मात्र कोठेही खबरदारी घेतली जात नाही़ सध्या रस्त्याच्या दुतफर् ा हॉटेल व धाब्यांची स्पर्धा सुरू आहे़ शासनाची कसलीही परवानगी न घेता सर्रास राष्ट्रीय महामार्गापर्यंत भराव करण्यात आल्याने पाण्याचे प्रवाह बंद झाले आहेत़ अनेक धनिकांनी डोंगरभाग व रस्त्याच्या कडेला जागा घेऊन सीमाभिंत बांधल्याने पाण्याला अडथळा निर्माण झाले आहेत़ रस्त्याच्या कडेची भातशेती धोक्यात आली आहे़ अनेक वेळा या विषयावर आवाज उठविल्यानंतरही महसूल यंत्रणा जागी होत नाही. भराव व अनधिकृत बांधकामे राजरोसपणे उभी राहत असताना आर्थिक लालसेपोटी महसुलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून शेवटच्या शिपायापर्यंत सर्वच जण मूग गिळून गप्प बसतात. यामुळे मावळात अनधिकृत भराव व बांधकामांचे पेव वाढले आहे़ याचा परिणाम मात्र सर्वांनाच भोगावा लागतो आहे़मावळ तालुक्यात सरासरी दीडशे ते दोनशे इंच पाऊस मावळात पडतो़ शुक्रवारी मावळातील कामशेत विभागात दिवसभरात झालेला १४० मिमी पाऊस, कार्ला विभाग ११८ मिमी, लोणावळा विभाग ९० मिमी व शिवली विभागातील ११० मिमी पावसाने मावळातील बहुतांश अंतर्गत रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग व रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले होते. वाहतूक व्यवस्था ठप्प होणे, जनजीवन विस्कळीत होणे, याला कोण जबाबदार आहे? याचा काळजीपूर्वक विचार होणे गरजेचे आहे़ महसूल विभागाने तातडीने बेकायदेशीरपणे भराव करणाऱ्यांवर कारवाई करत पाण्याचे मार्ग मोकळे करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत आहे़मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असताना दर वर्षी पावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व पाण्याच्या मोऱ्यांची सफ ाई केली जायची. तसेच रस्त्यांच्या कडेने दुतफर् ा पाणी वाहून नेण्यासाठी चर केले जायचे. मात्र, हा रस्ता देखभाल दुरुस्तीकरिता आयआरबी कंपनीच्या ताब्यात दिल्यानंतर आयआरबी कंपनीकडून ही कामे झाली नाहीत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील याकडे लक्ष न दिल्याने रस्त्यांच्या मोऱ्या बंद होऊन मावळातील रस्त्यांवर पाणी चढले असल्याचे जाणकारांनी सांगितले़
बेकायदा भरावांमुळे पूरस्थिती
By admin | Updated: September 20, 2015 00:34 IST