शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पूरस्थिती; शासकीय यंत्रणा जवळपासही नाही- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 17:41 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळत असलेल्या पावसावर चिंता व्यक्त केली आहे.

पुणेः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळत असलेल्या पावसावर चिंता व्यक्त केली आहे. पुण्यातल्या श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी राज्यात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, मुसळधार पावसानं कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घर, लहान मोठ्या व्यवसायांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राची प्रशासकीय यंत्रणा दरवेळी संकटं आल्यावर कष्ट करायला तयार असते. यावेळी मात्र शासकीय यंत्रणा जवळपास नाही, अशी परिस्थिती आहे. कोल्हापूर आणि सांगली हा महत्वाचा भाग आहे. इथून सर्वाधिक दुधाचा पुरवठा होता. इथून 30 ते 40 टक्के दुधाचा पुरवठा होतो. या भागात चहुबाजूंनी नुकसान झाले आहे. अशी स्थिती माझ्या पाहण्यात आलेली नाही. यावेळी पुराची व्याप्ती मोठी आहे. अभूतपूर्व नुकसानाला राज्य तोंड देत आहे. सरकारने पाणी आटल्यावर ताबडतोब नुकसान भरपाई द्यायला हवी, पंचनामे करावेत, अशी मागणीही पवारांनी केली आहे. आज प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता पूरग्रस्तांना सेवाभावी संस्था, सार्वजनिक संस्थांनी एकत्र येऊन मदत करावी. पूरग्रस्तांना राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी त्यांचे एक महिन्याचे मानधन देणार आहेत. लोकांना वाचवणं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण नंतर करूया, आधी लोकांना मदतीची गरज आहे. माझं सगळ्यांना आव्हान आहे की, या संकटातून बाहेर काढताना जमेल ते ते सगळे करूया. जमेल त्यांनी संस्थेच्या किंवा व्यक्तिगत माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करावी, असंही पवार म्हणाले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऊसपिकांच्या शेतांची माहिती घ्यावी. माझ्या पक्षाची यात्रा दुष्काळी भागात आहे. पूरग्रस्तभागात नाही. मात्र आम्ही ती आज आम्ही ती थांबवत आहोत. कार्यकर्त्यांची ऊर्जा मदतीसाठी लागणे गरजेचे आहे. एनडीआरएफसारखी यंत्रणा राज्य सरकारने करणे गरजेचे आहे. 2005पेक्षा यावेळी परिस्थिती गंभीर आहे. यंदा चित्र अधिक गंभीर आहे. व्यक्तीगत अनुभव म्हणून महाराष्ट्रात प्रशासक म्हणून काम केले. ज्या ज्या वेळी संकटे आली  तेव्हा महाराष्ट्राची यंत्रणा तुटून पडली. यावेळी असे का झाले नाही हे माहिती नाही.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर