शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Airport: लोहगाव विमानतळावरील हवाई वाहतूक 15 दिवस बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 15:32 IST

पुणे: आजपासून (16 ऑक्टोबर) 15 दिवस पुणे येथील लोहगाव विमानतळावरील उड्डाणे बंद राहणार आहेत. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी उड्डाणे बंद राहणार आहेत. सप्टेंबर 2020 ...

पुणे: आजपासून (16 ऑक्टोबर) 15 दिवस पुणे येथील लोहगावविमानतळावरील उड्डाणे बंद राहणार आहेत. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी उड्डाणे बंद राहणार आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये हवाई दलाकडून विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामातील महत्त्वाचा टप्पा 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामूळे 29 ऑक्टोबरपर्यंत विमानतळ पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

लोहगाव विमानतळ बंद राहण्याची घोषणा प्रशासनाने फक्त 10 दिवस अगोदर सांगितल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. या निर्णयाचा फटका 16 ते 30 ऑक्टोबर दरम्यान तिकिट रिजर्वेशन केलेल्या प्रवाशांना बसणार आहे. यापूर्वी कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनच्या काळात रात्रीची उड्डणे बंद केल्याने हजारो प्रवाशांना तिकिटे रद्द करावी लागली होती. आताही तिकिटे बुक केलेल्या प्रवाशांना तिकिट रिजर्वेशन रद्द करण्यास आणि त्याचा परतावा परत मिळवण्यास मोठी दमछाक करावी लागणार आहे.

दसऱ्याच्या दिवशी पुणे विमानतळावरून तब्बल ६३ विमानांची उड्डाणे झाली. यात ९८०३ प्रवासी पुण्याहून दुसऱ्या शहरांत गेले तर ८५२४ प्रवासी पुण्यात दाखल झाले. प्रवासी संख्या हि देखील विक्रमी आहे. कोरोनच्या दुसऱ्या लाटे नंतर सुरु झालेल्या विमानसेवेतला हा आज वरचा सर्वाधिक आकडा आहे. शनिवार पासून पुणे विमानतळ बंद होणार असल्याने प्रवासी वाहतूक वाढली.

टॅग्स :pune airportपुणे विमानतळAirportविमानतळLohgaonलोहगावpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड