शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेला फ्लेक्सबाजी महागात; गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 03:14 IST

महापालिका भवनसमोर भाजपाच्या एका महिला नगरसेविकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठा फ्लेक्स लावला. परंतु कार्यकर्त्यांची ही फ्लेक्सबाजी संबंधित नगरसेविकेला चांगलीच महागात पडली आहे.

पुणे : महापालिका भवनसमोर भाजपाच्या एका महिला नगरसेविकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठा फ्लेक्स लावला. परंतु कार्यकर्त्यांची ही फ्लेक्सबाजी संबंधित नगरसेविकेला चांगलीच महागात पडली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित नगरसेविकेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे पत्र घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने शिवाजीनगर पोलिसांना दिले आहे.महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख उपायुक्त विजय दहिभाते यांनी सांगितले, की सामाजिक कार्यकर्त्या कनिझ सुखरानी यांनी बेकायदा फ्लेक्सबाजी विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सुनावणीदरम्यान सुखरानी यांच्या वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही शहरात राजकीय कार्यकर्त्यांकडून बेकायदेशीररीत्या फ्लेक्स लावण्यात येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी नुकतेच महापालिकेसमोर भाजपा नगरसेविका अर्चना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या अवाढव्य फ्लेक्ससह येरवडा परिसरातील दोन आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आलेला एक अशा चार फ्लेक्सचे फोटो न्यायालयात सादर केले. यावर न्यायालयाने फ्लेक्स लावणाºयांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने याप्रकरणी नगरसेवक अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहे. तसेच येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत लावण्यात आलेल्या दोन फ्लेक्सवर तसेच ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील फ्लेक्सवर ज्या कार्यकर्त्यांचे छायाचित्र आहेत, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र येरवडा आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडून अनुक्रमे येरवडा आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.याचिकेवर निर्णय होण्याची शक्यताकनिझ सुखरानी यांनी बेकायदा फ्लेक्सबाबत दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी (दि.२) पुढील सुनावणी आहे. यासंदर्भात माहिती देताना विजय दहिभाते यांनी सांगितले, की तीन दिवसांपूर्वी न्यायालयाने सुनावणीदरम्यान, बेकायदा फ्लेक्स लावणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यासोबतच यापूर्वी राजकीय पक्षांनी बेकायदा फ्लेक्सबाबत न्यायालयात सादर केलेली प्रतिज्ञापत्रही उपस्थित ठेवण्यास सांगितली आहेत.

टॅग्स :BJPभाजपाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट