शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पाणथळ जागा नसल्याने उजनीकडे फ्लेमिंगोची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : यंदा हवामानात खूप बदल झाले आहेत. त्यामुळे भिगवण परिसरात पक्ष्यांची संख्या कमी असून, फ्लेमिंगोची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : यंदा हवामानात खूप बदल झाले आहेत. त्यामुळे भिगवण परिसरात पक्ष्यांची संख्या कमी असून, फ्लेमिंगोची प्रतीक्षा करावी लागत आहे. पट्टकादंब किंवा राजहंस (bar-headed geese), चक्रवाक आणि अन्य स्थानिक पक्ष्यांचे मात्र सहज दर्शन होत आहे. यंदाच्या दमदार आणि दिवाळीपर्यंत लांबलेल्या पावसामुळे उजनी धरण काठोकाठ भरले आहे. परिणामी पाणथळ जागा आणि त्या भोवती तयार होणारा पक्ष्यांसाठीचा अनुकूल अधिवास यंदा नाही. परिणामी फ्लेमिंगो अद्याप आलेले नाहीत. पाणी पातळी कमी झाल्यास जानेवारीअखेरपर्यंत त्यांचे आगमन होऊ शकते, अशी शक्यता पक्षीतज्ज्ञांनी वर्तविली.

‘अन्नासाठी दाही दिशा, आम्हां फिरविसी जगदिशा’ या उक्तीप्रमाणे फ्लेमिंगो वर्षातून दोनदा एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करतात. उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात आणि दक्षिणेकडून पुन्हा उत्तरेकडे हे पक्षी स्थलांतर करतात. या पक्ष्यांची असामान्य दृष्टी स्थलांतर करताना उपयोगी ठरते.

जमिनीवरील वैशिष्ट्यपूर्ण चिन्हे दिसावीत म्हणून फ्लेमिंगो अतिउंचावर उडावे लागते. विशेषत: समुद्र ओलांडत असताना उंचीवरुन उडणे त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरते. रात्री आकाशातून प्रवास करणारे पक्षी ग्रह-नक्षत्रांचा मागोवा घेत संचार करतात, असा सिद्धांत जर्मन पक्षिशास्त्रज्ञ ई. एफ. जी. सावर यांनी मांडला आहे. पक्षी आकाशातील ग्रहगोलांना अनुसरून रात्री स्थलांतर करतात. एरवी भूतलावरील चिन्हे अंधारात दिसणे अशक्यच असते. पक्षी आपल्या इच्छित स्थानी कसे पोचतात याचा उलगडा अद्यापही नेमकेपणाने झालेला नसल्याचे निरिक्षण अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी त्यांच्या ‘पक्षीकोशा’त नमूद केले आहे.

...म्हणून पक्ष्यांचे आगमन कमी

यंदा पाऊस लांबला. त्यामुळे जलाशयाभोवतालची अन्नसाखळी तयार होण्यास कालावधी लागणार आहे. तापमान, वाऱ्याची दिशा आणि लहरींचे अचूक ज्ञान पक्ष्यांना असते. त्यामुळे यंदा नोव्हेंबरमध्येच तज्ज्ञांनी अंदाज वर्तविला होता की, स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबणार आहे. त्यानुसार अजूनतरी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमीच आहे.

दिवसाला दोनशे ते तीनशे किमीचा प्रवास

पट्टकादंब हा दिवसाला दोनशे ते तीनशे किलोमीटर प्रवास करू शकतो आणि ताशी वेग ३५ ते ४५ किलोमीटर असते. सुमारे २७ हजार फूट उंचावरून ते उडत पुण्याकडे येतात. तिबेट, कझाकिस्तान, रशिया, मंगोलिया या देशांमधून पट्टकादंब भारतात येतात.

बार हेडेड गूस, चक्रवाक, फ्लेमिंगो साधारणपणे ऑक्टोबर-नोंव्हेबरमध्ये पुणे परिसरात येतात. यंदा पाऊस खूप झाल्याने उजनी धरण परिसरात फ्लेमिंगो पक्षी अजून आले नाहीत. त्यांना पाणथळ (दलदल) जागा लागते. पण अजून तशी जागा भिगवणला निर्माण झालेली नाही. हवामानाचा अंदाज त्यांना असतो. हिमालय ओलांडून ते आपल्याकडे येतात. उडण्याची प्रचंड क्षमता असणारे हे पक्षी एव्हरेस्टवरून उडत येतात. त्या पर्वतावर ऑक्सिजन विरळ असतो तरी ते सहज येतात. यावरून या पक्ष्यांचे वैशिष्ट्य समजून येते.

- धर्मराज पाटील, पक्षी अभ्यासक

आपल्याकडे येणारे फ्लेमिंगो प्रामुख्याने पर्शियातून येतात. ते स्थलांतर करण्यापुर्वी पाहणी करतात. जर तेथील वातावरण अनुकूल नसेल तर तिथे थांबत नाहीत. नंतर येतात. हे पक्षी दिवसाला १०० ते २०० किमी अंतर कापतात.

- डॅा. सतीश पांडे, पक्षीतज्ज्ञ