दौंड : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीतील कारगिल इंडिया कंपनीत शनिवार (दि. १२) रोजी दुपारच्या सुमारास कंपनीतील पाच कामगार भाजले. ही घटना कशी घडली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. कंपनीतील स्टीम (वाफ) लिकीज झाल्याने हे कामगार भाजले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलिसात नोंद झाली नव्हती.सुरेंद्रकुमार सरोज (वय २०), फैयाज हमीद (वय २४), अभय राज (वय १९), सुधीर आवटी (वय ४०), मोहन सरोज (वय २५) (सर्व रा. कारगिल कॉलनी, कुरकुंभ, ता. दौंड) हे भाजले आहेत. त्यांच्यावर दौंड येथील पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुपारी घटना घडल्यानंतर एकच धावपळ झाली. या वेळी सुधीर आवटी हे भाजलेच, परंतु पळत असताना ते पडले आणि त्यांचा हात फॅक्चर झाला. पाचही रुग्ण २० टक्के भाजले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. समीर कुलकर्णी यांनी सांगितले.या घटनेची माहीती मिळताच दौंड पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर तसेच पोलीस जमादार पंडित मांजरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र कुठल्याही स्वरुपाची जिवीतहानी किंवा आर्थिक नुकसान झाले नसल्याचे उघड झाले. तरिही सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन संभाव्य उपाय योजना करण्याचे व पुढील काळात निर्माण होण-या अपघाताला टाळण्याबाबत उपाय योजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(वार्ताहर)कारगील इंडिया ही कंपनी उच्च प्रतीच्या सुरक्षा सुविधा पुरवणारी ही कंपनी आहे. अचानक घडलेली ही घटना असुन रिफायनरी ४ मध्ये छोट्याशा आगीमुळे ही घटना घडली. यामध्ये किरकोळ जखमी वगळता कुठलीही मोठी हानी झाली नाही. नाही तरी पुढील तपास उच्च अधिकारी वर्गाकडुन करण्यात येत आहे . - संदीप मिसाळ, अधिकारी कारगिल इंडिया.
कारगिल कंपनीत पाच कामगार भाजले
By admin | Updated: November 13, 2016 04:16 IST