शिक्रापूर : मलठण फाटा येथील मनीष विहार येथे राहणार्या एकाच कुटुंबातील पाच जणांना डेंग्यूची लागण झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दहा दिवसांपूर्वी विवाहितेला ताप आल्याने खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाली. तेथे तिला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर तिला पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला, मुला-मुलींना व पतीला डेंग्यूची लागण झाली. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी ‘लोकमत’मध्ये शिक्रापूर परिसरात घाणीचे साम्राज्य अशा आशयाची बातमी छापून आली होती. शासकीय पातळीवर व ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने शिक्रापूर परिसरात गंभीर आजारांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. पाबळ-शिक्रापूर रोड, त्याचबरोबर संपूर्ण गावठाण व वाड्यावस्त्यांवर स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
एकाच कुटुंबातील पाच जणांना डेंग्यूची लागण
By admin | Updated: May 23, 2014 05:06 IST