शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड घायवळच्या आणखी पाच साथीदारांना अटक; गुन्हे शाखेची पुण्यात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 19:22 IST

कुख्यात गुंंड नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४२, रा शास्त्रीनगर, कोथरूड) याच्या आणखी पाच साथीदारांना गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने अटक केली.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाची कारवाई २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांचा आदेश

पुणे : दरोड्याच्या गुन्ह्यात कुख्यात गुंंड नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४२, रा शास्त्रीनगर, कोथरूड) याच्या आणखी पाच साथीदारांना गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने अटक केली. त्यांना २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांनी दिला आहे. अक्षय दिलीप गोगावले (वय २०), संदिप राम फाटक (वय २७), महेश बाळासाहेब आधवडे (वय २८, तिघेही रा. शास्त्रीनगर, कोथरूड), संतोष उर्फ दादू नागु कांबळे (वय ३०, रा. हनुमाननगर, दत्तवाडी) आणि स्वप्नील उर्फ मुन्ना सुखदेव रॉय (वय २६, जनता वसाहत) अशी  पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. घायवळ टोळीचा प्रमुख नीलेश आणि त्याचा साथीदार सागर सोनबा जोगावडे (वय २९, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) यांना या पूर्वी अटक करण्यात आली असून त्यांनाही २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विकी सिबू रवानी (वय २२, रा. ढोले पाटील रस्ता, मूळ. झारखंड) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :ArrestअटकPuneपुणे