शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चाकण जाळपोळ व हिंसाचार घटनेत आणखी पाच आरोपींना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 20:50 IST

सोमवारी ३० जुलैला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्यावेळी काही समाजकंटकांनी शासकीय व खासगी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती.

ठळक मुद्देअटक आरोपींची एकूण संख्या तेवीस : चौकशीसाठी २० जण ताब्यात निरपराध तरुणांना चौकशी करून सोडले वाहनांची जाळपोळ , हिंसाचार फोटो, व्हिडीओ असल्यास ते चाकण पोलीस ठाण्यात जमा करून सहकार्य करण्याचे आवाहन

चाकण :  सोमवारी ( ३० जुलै ) रोजी झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान वाहनांची जाळपोळ व तोडफोड, हिंसाचार प्रकरणी आज ( दि. ३ ) आणखी पाच जणांना अटक करण्यात आली असून अटकेतील आरोपींची एकूण संख्या २३ झाली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी आणखी २० जणांना आज ताब्यात घेण्यात आले असून ताब्यात घेतलेल्या तरुणांनाची कसून चौकशी करण्यात येत आहे. मराठा मोर्चाच्या आयोजकांनी मागणी केल्यानुसार, निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल केले जात नसून दोषी आढळणाऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले. या चौकशीकामी स्थानिक नागरिकांचे सहकार्य मिळत असून सीसी टीव्ही फुटेज, सोशल मीडियावरील व्हिडीओ, फोटोंच्या माध्यमातून अनेकांची ओळख पटत आहे. अजूनही ज्या नागरिकांकडे असे फोटो, व्हिडीओ असल्यास ते चाकण पोलीस ठाण्यात जमा करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सोमवारी ३० जुलैला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्यावेळी काही समाजकंटकांनी शासकीय व खासगी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती. तसेच पोलिसांवर दगडफेकही झाली होती. या जाळपोळ व हिंसाचार प्रकरणी गुरुवार पर्यंत एकूण १८ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी ३ जण अल्पवयीन आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी १५ जणांना गुरुवारी संध्याकाळी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य न्याय दंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी १५ आरोपींना ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज ( दि. ३ ) आणखी पाच आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली असून पाचही आरोपींची नावे पोलीस सूत्रांनी गुप्त ठेवली आहेत. याप्रकरणी गुरुवार ( दि. २ आॅगस्ट ) रोजी मनोज दौलत गिरी (वय-२३), सूर्यकांत बाळू भोसले (२१), परमेश्वर राजेभाऊ शिंदे(२२), अभिषेक विनोद शाह(१९), विशाल रमेश राक्षे(२६), सत्यम दत्तात्रय कड (१९), समीर विलास कड(२०), रोहिदास काळूराम धनवटे (१९), विकास अंकुश नाईकवाडी (२८), सोहेल रफिक इनामदार (१९), प्रवीण उद्धव गावडे(२३), आकाश मारुती कड(२५), सचिन दिगंबर आमटे (२७), आनंद दिनेश मांदळे (१८), प्रसाद राजाराम खंडेभराड (१८) यांना अटक करून न्यायालयाने  पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पीआय मनोजकुमार यादव, एलसीबीचे पीआय दयानंद गावडे, पीएसआय महेश मुंडे, एपीआय प्रशांत पवार व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :ChakanचाकणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPoliceपोलिस