शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात पाच घरफोड्या

By admin | Updated: May 3, 2017 02:11 IST

शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे कोणी मूळ गावी, तर कोणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले आहेत. काही लग्न समारंभाच्या

वाकड : शाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्यामुळे कोणी मूळ गावी, तर कोणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले आहेत. काही लग्न समारंभाच्या निमित्ताने गेले आहेत. या संधीचा फायदा उठविण्यासाठी चोरट्यांनी बंद सदनिका चोरीसाठी लक्ष्य केल्या. मंगळवारी भर दिवसा झालेल्या घरफोडीसह दोन दिवसांत तब्बल पाच घरफोड्यांत लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. चोरट्यांनी ३१ एप्रिलच्या मध्यरात्री गणेशनगर, थेरगाव भागात दोन, वाकड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सद्गुरू कॉलनीत एक, ताथवडेत एक घरफोडी केली. याप्रकरणी लहू प्रभाकर कदम (वय ४५, रा. दुर्गा कॉलनी, गणेशनगर) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. रहाटणीतील महात्मा फुले कॉलनीत भर दुपारी १२ ते ३च्या सुमारास घरातील लोक कार्यक्रमासाठी बाहेर गेले असता सदनिकेचे कुलूप उचकटून साडेएकोणतीस तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी पळविले. याप्रकरणी योगेश धोंडिबा लांडगे (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुर्गा कॉलनी, गणेशनगर, थेरगाव येथे तीन तोळे सोने व रोख सहा हजार रुपये चोरीला गेले. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव येथे कपाट उचकटून दोन हजार रुपये पळविले. या ठिकाणी शेजारी राहणाऱ्या इसमाने आरोपींना पाहिले असून चार इसम काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले होते, अशी माहिती पोलिसांना दिली आहे. सद्गुरू कॉलनी, वाकड येथे राहुल अवचार यांच्या घरातून देवीचा चांदीचा मुकुट, एक तोळ्याचे सोन्याचे गंठण व अन्य दागिने असे दोन तोळे साने आणि ताथवडे येथे कपड्यांचे दुकान फोडून दोन लाखांच्या साड्या चोरट्यांनी पळविल्या आहेत. सुटीच्या काळात नागरिक गावी जातात, हे लक्षात घेऊन वाकड पोलिसांनी वाकड हद्दीच्या प्रवेशमार्गावर तापकीर मळा चौक, रहाटणी रस्ता,गोडांबे चौक, बिर्ला हॉस्पिटल चौक या ठिकाणी चेक पॉइंट केले आहेत. मध्यरात्री एक ते पहाटे पाचपर्यंत येथून ये -जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची  आणि व्यक्तीची चौकशी करून  त्याची नोंद डायरीत केली  जाते. त्यामुळे चोरट्यांनी रावेत- पुनावळे येथील पुलाचा मार्ग वाकड हद्दीत प्रवेशासाठी अवलंबला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)महिलेचे हात-पाय बांधून ऐवज लुटलातळेगाव दाभाडे : घरात झोपलेल्या महिलेचे हातपाय बांधून चोरट्यांनी सव्वानऊ तोळे सोन्याचे दागिने व दोन मोबाइल संच घेऊन पोबारा केला. चोरीची ही घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील नालबंदगल्ली येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंदुबाई सुलतानसिंह ठाकूर (वय ४९, रा. नालबंद गल्ली, तळेगाव दाभाडे) या घरात झोपल्या होत्या. त्याच वेळी चोरटे घरात शिरले. ठाकूर यांचे हात-पाय बांधून सव्वा नऊ तोळे सोन्याचे दागिने व दोन मोबाइल घेऊन चोरटे पसार झाले. ठाकूर यांची शेजारच्यांनी सुटका केली. नंतर मंगळवारी दुपारी ठाकूर यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तळेगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.