शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

जयंत पाटील यांच्या संस्थेला पाच कोटींचा दंड, जिल्हाधिका-यांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 04:34 IST

माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या कासेगाव एज्युकेशन सोसायटीला शैक्षणिक प्रयोजनासाठी मावळ तालुक्यातील मौजे कुणेनामा येथे सुमारे ७ हेक्टर सरकारी जमीन नाममात्र दराने २००६ मध्ये वाटप करण्यात आली.

पुणे : माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या कासेगाव एज्युकेशन सोसायटीला शैक्षणिक प्रयोजनासाठी मावळ तालुक्यातील मौजे कुणेनामा येथे सुमारे ७ हेक्टर सरकारी जमीन नाममात्र दराने २००६ मध्ये वाटप करण्यात आली. परंतु गेल्या १० वर्षांत या जागेचा काहीच वापर न केल्याने व आता येथे बांधकाम करण्यासाठी पुढील २ वर्षे मुदत वाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु शासनाच्या २०११ च्या नवीन धोरणानुसार जागेचा वापर करण्यासाठी संस्थेला ५ कोटी ३० लाख रुपयांचा दंड विलंब शुल्क म्हणून भरण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस  आघाडी शासनाच्या काळात मोठ्या प्रमाणात खासगी व्यक्तींना शैक्षणिक संस्थांच्या नावाखाली सरकारी भूखंडांची खिरापत वाटण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने विविध मंत्री व राजकीय व्यक्तींच्या संस्थांचीमोठी संख्या आहे. परंतु यातील अनेक संस्थांनी सरकारी जागा घेऊन दहा-दहा वर्षे काही वापरच केलेला नाही. यामध्येच राष्ट्रवादीचे नेते व माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या कासेगाव एज्युकेशन सोसायटीस शैक्षणिक कामासाठी मावळ तालुक्यातील कुणेनामा येथे ७ हेक्टर जमीन सन २००६ मध्ये अत्यंत नाममात्र दरामध्ये वाटप करण्यात आले.संस्थेला २००६ मध्ये जमीन वाटप करण्यात आले. त्यानंतर सन २०१४ पर्यंत या जमिनीचा वापरच करण्यात आला नाही. त्यानंतर वाटप करण्यात आलेल्या सरकारी जागेचा वेळेत वापर न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संस्थेला नोटीस देण्यात आली.या नोटीसीनंतर संस्थेने दोन वर्षांची मुदत वाढ मागितली. संस्थेला देण्यात आलेल्या जागेवर दोन वर्षांत बांधकाम करू असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु त्यानंतर देखील संस्थेने काहीच काम सुरु केले नाही.यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मावळ तहसिलदारा मार्फत संस्थेच्या जागेची तपासणी करण्यात आली.परंतु मुदत वाढ दिल्यानंतर ९ डिसेंबर २०१४ ते ८ डिसेंबर २०१६ पर्यंत कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम सुरुच केलेले नसल्याचे तपासणीमध्ये समोर आले. संस्थेच्या वतीने पुन्हा दोन वर्षांची मुदत वाढ मागितली.२०११ चा अध्यादेश...जिल्हाधिकारी कार्यालयाचे महसूल तहसीलदार प्रल्हाद रिरामणी यांनी सांगितले, की शासनाने सरकारी जागांबाबत २०११ मध्ये स्वतंत्र अध्यादेश काढून खास धोरण जाहीर केले आहे. यानुसार संबंधित संस्थेने वाटप करण्यात आलेल्या जागेचा वापर न केल्यास चालू बाजारभावाच्या दहा टक्के रक्कम व एक टक्के विलंब शुल्कासह दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे.