शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Visarjan 2018: गणेश विसर्जनादरम्यान पाच मुले बुडाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 18:54 IST

Ganesh Visarjan 2018: गणेश विसर्जनादरम्यान तळ्यातील नारळ काढण्यासाठी गेलेली पाच शाळकरी मुले पाण्यामध्ये बुडाली. यापैकी तीन मुलांचा मृत्यू झाला तर दोन मुले अत्यवस्थ आहेत.

ठळक मुद्देतिघांचा मृत्यू : दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु

नारायणगाव / निमगाव सावा : गणेश विसर्जनादरम्यान तळ्यातील नारळ काढण्यासाठी गेलेली पाच शाळकरी मुले पाण्यामध्ये बुडाली. यापैकी तीन मुलांचा मृत्यू झाला तर दोन मुले अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही पिंपरी कावळ (ता. जुन्नर) येथे रविवारी संध्याकाळी घडली. वैभव विलास पाबळे (वय ११), गणेश नारायण चक्कर (वय ९) , सुमित सावकार पाबळे (वय ११) अशी मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. ओंकार एकनाथ चक्कर, तन्मय शांताराम पाबळे अशी जखमींची नावे आहेत. पिंपरी कावळ या गावातील तळ्यावर गणेश विसर्जन सुरु होते. संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास अंबिकामाता मंडळाचा गणपती विसर्जनासाठी तळ्यावर आणण्यात आला. तेव्हा काही लहान मुले या पदाधिकाऱ्यांकडे धावत आली. त्यांनी तळ्यामध्ये काही मुले बुडाल्याची माहिती दिली. कार्यकर्त्यांनी तात्काळ तलावाकडे धाव घेतली. त्यावेळी पाण्यावर दोन मुले तरंगताना दिसली. यामध्ये ओंकार व तन्मयचा समावेश होता. या दोघांना तातडीने बाहेर काढण्यात आले. तर अन्य मुलांचा पाण्याच्या तळाशी शोध घेण्यात आला. तेव्हा वैभव, गणेश आणि सुमित खोल पाण्यात आढळून आले. या पाचही जणांना तातडीने उपचारांसाठी जांबूत (ता. शिरुर) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्याकडे आॅक्सिजनची व्यवस्था नसल्याने त्यांना आळेफाटा येथील डॉ. आकाश आवारी, राहुल फावडे व संतोष कसबे यांच्या रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान, डॉक्टरांनी तीन मुलांना मृत घोषित केले. तर दोन मुलांवर उपचार सुरु आहेत. घटनास्थळाला सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलिसांसह भेट दिली.

टॅग्स :narayangaonनारायणगावGanesh Visarjanगणेश विसर्जनdrowningपाण्यात बुडणेGanpati Festivalगणेशोत्सव