शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हा काय मच्छीबाजार आहे का? निवडणूक निरीक्षक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 21:26 IST

एकूणच सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहरात निवडणुकीच्या नियमांचे पालन करण्यात अनेक घोळ झाले.

पुणे : मतदान झाल्यानंतर मशीन बंद न करणे, मतमोजणी करणारे कर्मचारी कधीही जागेवरून उठून जाणे, कोणाचाच कोणाशी मेळ नसणे अशा अनेक बाबीने निवडणूक निरीक्षक त्रासले होते. त्यात ६ व्या फेरीत शिवाजीनगर मतदारसंघामध्ये तिसऱ्या वेळी मतदान झाल्यानंतर मशीन बंद न केल्याचा प्रकार समोर आला, तेव्हा निरीक्षकांचा पारा चढला व ते म्हणाले ‘‘हा काय मच्छी बाजार आहे का? कर्मचारी जागेवर दिसत नाही़ त्याांचे व्हिडिओ शूटिंग घ्या. निवडणूक निर्णय अधिकारी व उमेदवार यांना बोलवा, मगच त्यांच्या साक्षीने पुढील निर्णय घ्या’’. निरीक्षकांच्या या पवित्र्याने मग धावपळ सुरू झाली. एकूणच सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहरात निवडणुकीच्या नियमांचे पालन करण्यात अनेक घोळ झाले. मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानाच्या प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण न केल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम मतमोजणी ला वेळ लागत गेला आहे. शिवाजीननगरमध्ये मशीन बंद न करण्याचा प्रकार घडला तर, त्याच्या नेमके विरुद्ध चित्र  पर्वती मतदारसंघात  दिसले़ तेथील किमान तीन मतदान केंद्रातील मशीन बंद करण्याची वेळ ही मतदान संपायच्या वेळेच्या अगोदर असल्याचे दिसून येत होते़ मतदान संपायची वेळ सायंकाळी ६ ची असताना या मशीनवर मशीन बंद करण्याची वेळ सायंकाळी ५़४३, ५़४७, ५़५३ अशी नोंदविण्यात आल्याचे दिसून आले होते़  व्हीव्ही पॅटची मोजली मतेकसबा पेठेत एक मशीन सुरु न झाल्याने शेवटी या मतदान केंद्रातील मतांसाठी व्हीव्ही पॅट मोजण्याचा निर्णय घेतला़ काही ठिकाणी १७ सी फॉर्मवर कंट्रोल युनिटचा नंबर लिहिला नसल्याचे आढळून आले़ एका ठिकाणी मतदान झाल्यानंतर मशीन बंद करण्यात आले नसल्याचे आता मतमोजणीच्या दिवशी लक्षात आले़ मतदान २३ एप्रिलला झाले़ त्यानंतर आता महिना पूर्ण झाला़ महिनाभर मशीन सुरु असले तरी त्याची बॅटरी ९० टक्के चार्ज असल्याचे दाखवत होती़ असे अनेक गमतीजमती पुणे लोकसभा मतदार संघात मतमोजणीच्या दिवशी आढळून आल्या़ .......

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालElectionनिवडणूकVVPATव्हीव्हीपीएटीpune-pcपुणे