शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ५१ गडांवर 'असा' साजरा होणार 'शिवराज्याभिषेक दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 22:06 IST

प्रत्येक गडांशी निगडीत असलेल्या वीर स्वराज्य घराण्यांचे वंशज आणि परिसरातील ग्रामस्थ, वीर मावळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे....

पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमत: राज्यातील तब्बल ५१ गडांवर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक, स्वराज्यदिन साजरा होणार आहे. प्रत्येक गडांशी निगडीत असलेल्या वीर स्वराज्य घराण्यांचे वंशज आणि परिसरातील ग्रामस्थ, वीर मावळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती 'गड तिथे शिवराज्याभिषेक दिन ; गड तिथे स्वराज्यदिन' सोहळ्याचे संकल्पक तसेच शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारली जाते. यावर्षी देखील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्वराज्यगुढी उभारुन पूजन होणार आहे. नुकतेच शिवाजीनगर येथील एसएसपीएम संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या पहिल्या भव्यदिव्य अश्वारुढ स्मारकापाशी असलेल्या जगातील पहिल्या शिवराज्याभिषेक शिल्पाचे पूजन करुन, महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाचे पूजन करण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात पासलकर, जेधे, कंक, बांदल, मालुसरे, शिळीमकर, गोळे, गायकवाड, पायगुडे, मरळ, जगताप, धुमाळ, हाडे, जाधवराव, पवार या स्वराज्यघराण्यातील सदस्यांना भगवा स्वराज्यध्वज गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समाधानाने भरली. आणि म्हणुनच ६ जून स्वराज्यदिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जुन २०१३ साला पासून भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत. 

शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगवा स्वराज्यध्वज निर्माण करण्यात आला आहे. शिवनेरी, तोरणा, राजगड, सिंहगड, रायरेश्वर, तुंग-तिकोणा, पुरंदर, रोहिडेश्वर, पन्हाळा, रामशेज, संग्रामदुर्ग, लोहगड, रोहिडा, मल्हारगड, विसापुर, चाकण, राजमाची, विसापुर, इंदूरी, मोरगिरी, कोरीगड, धनगड, कैलासगड, तैलबैला, सोनेरी, वज्रगड, केंजळगड, मोहनगड, कावळा, वैराटगड, चंदनगड, वंदनगड, कमळगड, पांडवगड, कलनिधी, विशाळ गड,भुदरगड, सामान गड, भैरवगड, जीवधन, वसंतगड या गडांवर सोहळा साजरा होणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन सोहळयाचे संकल्पक अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती गोळे, रवींद्र कंक, गणेश जाधव, समीर जाधवराव, अशोक सरपाटील, प्रवीण गायकवाड, संतोषराजे गायकवाड, सागर पवार, राजु सातपुते, संतोषराजे शिंदे यासह असंख्य स्वराजबांधवांनी  केले आहे.

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivrajyabhishekशिवराज्याभिषेकFortगड