शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

देशात प्रथमच यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन; २८ जानेवारीला पुण्यात आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 13:41 IST

यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी १० ते ७ या वेळेत गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात रंगणार आहे.

ठळक मुद्देडॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन कर्दळीवन सेवा संघाने आयोजित केले आहे यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन

पुणे : परिसंवाद, व्याख्यान, अनुभवकथन, माहितीपट, चित्र प्रदर्शन अशा उपक्रमांची मेजवानी असलेल्या देशातील पहिल्याच यात्रा परिक्रमा साहित्य संमेलनाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी १० ते ७ या वेळेत गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात रंगणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.कर्दळीवन सेवा संघाने यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन आयोजित केले आहे. साहसी आध्यात्मिक धार्मिक यात्रा, परिक्रमांची माहिती सर्वांना व्हावी, त्यातील अनुभवांची देवाणघेवाण व्हावी, एकमेकांना मार्गदर्शन करावे; या उद्देशाने हे संमेलन योजले आहे. या परिक्रमांनी साहित्य जगतामध्ये कोणते योगदान दिले आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक परिघांवर याचे कसे पडसाद उमटत आहेत. सांस्कृतिक समन्वय आणि एकीकरण कसे साधले जात आहे, युवा पिढी याकडे का आणि कशी आकर्षित होत आहे, या विषयांवर परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्रे, अनुभवकथन आणि डॉक्युमेंटरी फिल्म, चित्र प्रदर्शन, असे भरगच्च कार्यक्रम या परिक्रमा महोत्सवात होणार आहेत. देशात प्रथमच अशा प्रकारचे यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. लेखक, परिक्रमार्थी, यात्रा- परिक्रमा आयोजक, सामाजिक कार्यकर्ते असे समाजाच्या अनेक स्तरातील मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी यात्रा परिक्रमांची माहिती, परिक्रमार्थींच्या अनुभवांची देवाणघेवाण, परिक्रमांचे लघुचित्रपटांमधून दर्शन आणि त्यातून एक उत्कट अनुभूती असे या  संमेलनाचे स्वरूप आहे. अधिकाधिक रसिकांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केले आहे.या संमेलनातून निमाड अभ्युदय या भारती ठाकूर यांनी नर्मदा परिक्रमा किनारी स्थापन केलेल्या गरीब मुलांच्या शैक्षणिक आणि निवासी प्रकल्पासाठी संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या रसिकांच्या सहकार्याने ५ लाख रूपयांचा सामाजिक निधी अर्पण केला जाणार आहे. 

टॅग्स :P D Patilपी डी पाटीलd y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठPuneपुणे