शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

चासकमानमधून रब्बीचे पहिले आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 01:36 IST

४०० क्युसेक्सने विसर्ग सुरू; पिकांना होणार फायदा, टंचाई काही स्वरूपात संपणार

चासकमान : खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन शुक्रवारी सकाळी १० वाजता आमदार सुरेश गोरे, उपअभियंता उत्तम राऊत यांच्या उपस्थितीत टेल टू हेड पद्धतीने सोडण्यात आले. सुमारे ४०० क्युसेक्स वेगाने हे पाणी सोडण्यात येत असून, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.चासकमान धरणामधून खरीप हंगामाचे पहिले आवर्तन १६ जुलै रोजी सोडण्यात होते. परंतु परतीच्या पावसाने दडी मारल्याने खेडसह शिरूर तालुक्याच्या शेतकऱ्यांबरोबरच नागरिकांच्या पिण्याच्या मागणीनुसार पाणी सुरू ठेवण्यात आले होते. सोडण्यात आलेले खरीप हंगामाच्या पहिल्या आवर्तनाची गरज पूर्ण झाल्याने तब्बल ८९ दिवसांनंतर म्हणजेच १२ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता पहिले आवर्तन बंद करण्यात होते. परंतु खेड तालुक्यातील भीमा नदीतील पाणी कमी झाल्याने नदीअंतर्गत असलेल्या शेतकºयांची पिके धोक्यात आली होती. यामुळे काळूस संगमवाडी, शेलपिंपळगावसह पूर्व भागातील शेतकºयांनी २९ तारखेला भीमा नदीपात्रात चासकमान धरणाचे पाणी सोडण्यासंदर्भात निवेदन देऊनही या निवेदनाची दखल न घेतल्याने काळूस व शेलपिंपळगाव येथील शेतकºयांची उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५ कार्यालयाला घेराव घातला होता. अखेर उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक कार्यालयाने या पत्राची दखल घेत येत्या चार ते पाच दिवसांत प्राधान्याने सर्व बंधाºयांमध्ये पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी १० वाजता रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा फायदा खेडसह शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांनी आपल्या शेतात रब्बी हंगामातील घेण्यात आलेल्या कांदा, बटाटा, मका, गहू, आदीसह हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन हजारो हेक्टर पिकांना बहुतांश प्रमाणात फायदा होणार आहे. परंतु परतीच्या पावसाने दडी मारल्याने चासकमान धरणामधून शेतकºयांच्या मागणीनुसार खरीप हंगामाचे पहिले आवर्तन तब्बल ८९ दिवस सुरू ठेवल्याने ऐन आॅक्टोबरमध्ये १५ टक्के पाण्याची पातळी खालावली.मात्र सध्याच्या धरणातील पाण्याच्या परिस्थितीबरोबरच दुष्काळी परिस्थिती पाहता ऐन हिवाळ्यात चासकमानचे पाणी तापणार आहे.चासकमान धरणामधून पाणी सोडण्यात आल्याने धरणाअंतर्गत बँकअकाऊंटरवर असणाºया वाळद, आव्हाट, दरकवाडी, गुंडाळवाडी, वाडा, आदीसह विविध गावांतील पाणीपातळी खालावणार असल्याने गावातील पिण्याच्या पाण्याबरोबर शेतकºयांची पिके धोक्यात येणार असल्याने उन्हाळ्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी टेल टू हेड असा पाण्याचा वाद निर्माण होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. कालव्याअंतर्गत असलेल्या शेतकºयांच्या शेतजमिनीमध्ये सतत पाणी साचून शेतजमिनीच्या शेतजमिनी मोठ्या प्रमाणात नापिक झाल्या आहेत. दिवसेंदिवस पाण्याची नासाडी होत चालली आहे. मात्र पाण्याच्या होणाºया नासाडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.कालव्याच्या अस्तरीकरणाची प्रतीक्षाचासकमान धरणाच्या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकºयांना झाला आहे. कालव्याद्वारे पाणी सोडले जाते; परंतु पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही. कारण वर्षानुवर्षे कालव्याचे अस्तरीकरणच झाले नसल्याने पूर्ण क्षमतेने पाणी जर सोडले तरी कालवाफुटीची शक्यता जास्त असते. असे अनेक वेळा असे प्रकारही घडले आहेत. त्या मुळे कालव्यातुन जरी पाणी सोडले तरी ते शिरूरला कधी पोहोचेल, हे सांगता येत नाही.चासकमान धरणापासून ते कमान, चास, आखरवाडी, बहिरवाडी, भांबुरवाडी, तिन्हेवाडीदरम्यान आदी भागात पाणीगळतीचे प्रमाण सर्वाधिक पाहावयास मिळत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊनसुद्धा ओढे-नाले शेतकºयांच्या शेतजमिनीमधून वाहताना दिसतात.कालव्याला असणाºया गळतीमुळे कालव्यातून ३० ते ४० टक्के पाणी वापराविना वाया जाते. त्यामुळे पाणी सोडले तर शेवटपर्यंत पाणी पोहोचतच नाही. यामुळे खेड तालुक्याच्या धरणक्षेत्रात असणाºया गावांना आणि शिरूर तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत असणाºया नागरिकांना शेतीचे क्षेत्र वाचवण्यापासून वंचित राहावे लागते.मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे चासकमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया शेतकºयांना ऐन दुष्काळात तेरावा महिना निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मागील दोन वर्षांपूर्वी कालव्याअंतर्गत असलेल्या शेतकºयांच्या शेतीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे ‘धरण उराशी शेतकरी उपाशी’ अशी स्थिती निर्माण झाली होती. तशीच याही वर्षी परिस्थिती निर्माण होणार असल्याचे शेतकरी सांगत आहे.चासकमान धरणामध्ये सध्या ८४.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, पाणीपातळी ६४७.५८ मटीर आहे. धरणात एकूण साठा २०७.७३ दलघमी, उपयुक्त साठा १८०.५४ दलघमी इतका आहे. मागील वर्षी याच तारखेला १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता, तर पाणी पातळी ६३९.५३ मीटर, एकूण साठा २४१.६९ दलघमी, उपयुक्त साठा २१४.५० दलघमी होता. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी चासकमान धरणामध्ये १६ टक्के पाणीसाठा कमी आहे.शेतकरी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ओरडून ओरडून दमला आहे, परंतु ना प्रशासन लक्ष देते ना राज्यकर्ते. प्रशासनाला गळती रोखण्यासंदर्भात विचारले असता प्रशासन राज्यकर्त्यांकडे बोट दाखवतआहे मात्र प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्या वादात शेतकºयांच्या जमिनी मात्र वर्षानुवर्षे नापिक राहात आहेत. यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न संतप्त शेतकºयांना पडला आहे.