शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीसाठी सहकार विभागाला चार हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 19:43 IST

राज्यातील साडेआठ लाख शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी देण्यात आली असून त्यासाठी सहकार विभागाच्या खात्यावर शासनाने चार हजार कोटी रुपये १८ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी जमा केले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांमध्ये राज्य शासनाच्या नावाने करंट खाते उघडण्यात आले आहे.बँकांनी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करुन त्यांना तसे बेबाकी प्रमाणपत्र द्यायचे आहे. कर्जमाफीची रक्कम बँकांना दिली जाणार असून प्रोत्साहनपर रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार

पुणे : राज्यातील साडेआठ लाख शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी देण्यात आली असून त्यासाठी सहकार विभागाच्या खात्यावर शासनाने चार हजार कोटी रुपये १८ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी जमा केल्याची माहिती सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी दिली. बँकांनी शेतकर्‍यांना हिरव्या यादीप्रमाणे बेबाक प्रमाणपत्र द्यावे तसेच कर्जमाफीच्या रकमेसाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव पाठवावेत असे आवाहनही झाडे यांनी केले आहे.जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांमध्ये राज्य शासनाच्या नावाने करंट खाते उघडण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीची रक्कम या खात्यांवर दाखविण्यात येणार आहे. बँकांनी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करुन त्यांना तसे बेबाकी प्रमाणपत्र द्यायचे आहे. त्यानंतर बँकांनी कर्जमाफी दिलेल्या शेतकर्‍यांची यादी आणि रक्कम याचा प्रस्ताव सहकार विभागाला दिल्यानंतर बँकांच्या खात्यावर सहकार विभागाकडून पैसे जमा करण्यात येणार आहेत. दरम्यान, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होण्याशी बँकेच्या प्रस्तावाचा संबंध नाही. शासनाने घोषित केल्याप्रमाणे शेतकरी कर्जमुक्त झालेले आहेत. बँकांनी त्यांना बेबाक प्रमाणपत्र देताच ते सातबारा कोरा करुन घेऊ शकणार आहेत. बँकानी प्रस्तावाची वाट न पाहता त्यांना ही प्रमाणपत्रे द्यावीत. त्यानंतर सहकार विभागाला राज्यभरात शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जमाफीचा आकडा द्यावा, त्यानुसार रक्कम त्यांच्या खात्यांवर जमा केली जाईल असे झाडे म्हणाले. हिरव्या रंगाच्या यादीतील शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी देण्यात आली आहे. पिवळ्या रंगाच्या यादीतील शेतकर्‍यांच्या कागदपत्रांतील त्रुटी दूर करुन त्यांना हिरव्या यादीमध्ये घेऊन दुसर्‍या टप्प्यात त्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. तर लाल रंगाच्या यादीतील शेतकरी पिवळ्या आणि नंतर हिरव्या यादीमध्ये घेऊन त्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे. दरम्यान, कर्जमाफीची रक्कम बँकांना दिली जाणार असून प्रोत्साहनपर रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. राज्यातील एक हजार शेतकर्‍यांनाच आतापर्यंत प्रमाणपत्र देण्यात आलेली असून दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे कामामध्ये खंड पडला आहे. मात्र, येत्या काही दिवसात उर्वरीत शेतकर्‍यांना प्रमाणपत्रं देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बँकांकडून कर्जमाफीच्या रक्कम जमा करण्याचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. आवश्यकता भासल्यास शासन अध्यादेशाप्रमाणे ‘पोस्ट आॅडीट’ही करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक