लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) मुळे पहिला बळी गेला आहे. सिंहगड परिसरात राहणाऱ्या नांदोशी येथील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील पुणे विभागातील जीबीएसमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी सोलापूर येथे एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे. मृत महिला ही कॅन्सरग्रस्त होती.15 जानेवारी रोजी ससून रुग्णालयात त्या महिलेला दाखल करण्यात आले होते. या महिलेची श्वसनसंस्था निकामी झाल्याने तसेच फुफ्फुस, श्वासनलिकेला तीव्र संसर्ग झाल्याने मृत्यू झाला.
पुण्यात बुधवारी नवीन १६ रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्णांचा आकडा १२७ वर पोचला आहे. सोमवारी रुग्णसंख्या १११ होती. मंगळवारी ही संख्या स्थिर होती. मात्र, त्यामध्ये बुधवारी नवीन १६ रुग्णांची भर पडली आहे.