कल्याणराव आवताडे नऱ्हे : वडगाव स्मशानभूमीमध्ये असणारी डिझेल दाहिनी ही पुणे महानगरपालिका हद्दीतील पहिली डिझेल दाहिनी आहे, मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ही डिझेल दाहिनी बंद अवस्थेत असून परिसरातील गरीब, सर्वसामान्य लोकांना मात्र पैसे खर्च करून अंत्यविधी उरकावा लागत आहे. महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खडतर जीवनप्रवासानंतर मानवी देहाची स्मशानभूमीतही अवहेलना होत आहे. वडगाव येथील वीर बाजी पासलकर पुलाजवळ असणाऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी एकूण पाच दाहिनी आहेत. त्यातील चार दाहिनी ह्या लाकडाचा वापर करून अंत्यविधी होत असला तरी एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टीम चारही दाहिन्यांवर बसविण्यात आल्या आहेत, आणि एक डिझेलवर चालणारी दाहिनी मात्र गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे गरीब व सर्वसामान्य नागरिकांना मात्र पैसे खर्च करून लाकडासाठी ऐनवेळी धावपळ करावी लागते, त्यामुळे डिझेल दाहिनी ही असून अडचण नसून खोळंबा आहे. येथील डिझेल दाहिनी ऑपरेटर विकास आवळे यांनी सांगितले की, डिझेल दाहिनी चालविताना मी तीन वेळेस बचावलो आहे. मशीनमध्ये बिघाड असल्याने ती सध्या बंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
४पुणे शहरात पहिल्यांदा बसविण्यात आलेली डिझेल दाहिनी ही सध्या बंद असून, महानगरपालिकेच्या अधिकाºयांना बºयाच नागरिकांनी व राजकारण्यांनी याबाबत कळविले असतानाही याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने महानगरपालिका याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. ........नातेवाइकाच्या अंत्यविधी वेळी वडगाव स्मशानभूमी येथे गेलो असता डिझेल दाहिनी बंद असल्याचे समजले, लाकडाची वखार बंद असल्याने ऐनवेळी धावपळ करून सर्व साहित्य जमा करून साध्या दाहिनीवर अंत्यविधी करावा लागला. अशावेळी रात्री-अपरात्री नातेवाइकांची कुचंबणा तर होतेच शिवाय धावपळही होते. -दादासाहेब पोकळे ......गेल्या दोन वर्षांपासून डिझेल दाहिनी बंद अवस्थेत आहे, मात्र प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असून सर्वसामान्य जनतेला मात्र याचा त्रास होत आहे. -हरिश्चंद्र दांगट , नगरसेवक ............पुणे महानगरपालिका सदर डिझेल दाहिनीबाबत मी अधिक माहिती घेतो, बंद असल्यास सुरू करण्याबाबत मी कर्मचाºयांना सूचना देतो आहे. -श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग ....सदर डिझेल दाहिनी ही कालबाह्य झाली असून, तिथे गॅस दाहिनी बसविण्याचा विचार सुरू आहे. - गोरखनाथ कांबळे प्रभारी, निकिता बॉयलर कंपनी..............महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला असून, नवीन विद्युत दाहिनी बसवावी अशी मागणी केली आहे, मात्र याबाबत ठोस निर्णय न झाल्यास आम्ही नागरिकांसह आंदोलन करू. -हरिदास चरवड, नगरसेवक