शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिले कोविड रुग्णालय पुण्यात, वाचा उभारणीबद्दल सविस्तर माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 16:22 IST

नुकत्याच झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत कोविड रुग्णालयावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काही दिवसात कोरोना बाधित हजारो रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी काही दिवसात करणार आली.

राजानंद मोरेपुणे ; कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी सध्या नायडू रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयामध्ये पुरेशा बेड उपलब्ध आहेत. पण पुढे ही संख्या वाढत गेल्यास त्यांच्यावर एकाच ठिकाणी उपचार व्हावेत यासाठी ससून रुग्णालयाच्या ११ मजली नवीन इमारतीला 'कोविड १९' रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

हे चीन मॉडेल असून राज्यातील पाहिले कोविड रुग्णालय असणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत कोविड रुग्णालयावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काही दिवसात कोरोना बाधित हजारो रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी काही दिवसात करणार आली. एकाच ठिकाणी अनेक रुग्णांवर उपचार झाल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी कमी होतो. तसेच विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्यास त्या प्रत्येक रुग्णालयातील त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, अन्य कर्मचारी बाधित होण्याचा आकडा वाढू शकतो. तसेच एकाच ठिकाणी सर्व रुग्ण असल्यास समन्वय ठेवणेही सहज शक्य होते. हे चीन मॉडेल राज्यात पहिल्यांदा पुण्यात राबविले जाणार आहे. 

यासाठी ससून रुग्णालयाच्या आवारातील नवीन ११ मजली इमारतीची निवड करण्यात आल्याचे समजते. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी अद्याप पायाभूत सुविधा नाहीत. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सुमारे ५० बेडच्या अतिदक्षता विभागाची उभारणी केली जाणार आहे. तसेच ७०० हुन अधिक विलगीकरण बेड असतील.  रुग्ण संख्या वेगाने वाढल्यास ३१ मार्च पासूनच बाधित रुग्ण या रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात होऊ शकते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळ लागणार आहे. खासगी तसेच अन्य शासकीय रुग्णालयाची त्यासाठी मदत घेतली जाणार आहे. तेथील डॉक्टर्स, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना कोविड रुग्णालयात काम करावे लागू शकते. त्यासाठी लागणारे व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्सही त्यांना उपलब्ध करून घ्यावे लागणार आहेत. 

- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय :"कोविड रुग्णालयाबाबत चर्चा झाली आहे. अद्याप अंतिम निर्णय नाही. पण त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. शासन आदेशानुसार सर्व यंत्रणा सज्ज केल्या जातील."

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या