शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

‘सैनिकहो तुमच्यासाठी’ नाटिका प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:51 AM

न्यू बाल विकास मंदिर शाळेने पटकावला चषक

बारामती : येथील एन्व्हॉयर्नमेंटल फोरम आॅफ इंडियाच्या वतीने आयोजित मृद्गंध २०१८ विविधगुणदर्शन स्पर्धेत पिंपळीच्या विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर शाळेच्या ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ नाटिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी मृद्गंध विविधगुणदर्शन स्पर्धा दर वर्षी आॅगस्ट महिन्यात घेतली जाते. स्पर्धेचे यंदाचे सातवे वर्ष आहे. या वर्षी १८ शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांच्या प्लॅस्टिकबंदीच्या सादरीकरणाला द्वितीय, तर विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर व विद्या प्रतिष्ठान सीबीएसई स्कूलने सादर केलेल्या ‘हास्यरस’ या सादरीकरणाला विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला.विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेला उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान केले गेले. उत्कृष्ट अभिनय पुरुष - हर्ष प्रणेता रजपूत (विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर) व आदित्य हनुमंत भोसले (सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल, विद्या प्रतिष्ठान), उत्कृष्ट अभिनय महिला- अदिती किरण सोरटे (विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल), सानिका पणधीरकर (विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी), उत्कृषेट नेपथ्य- प्रवीण टिळेकर (विद्या प्रतिष्ठान बिल्ट, भिगवण शाळा), संदीप यादव (विद्या प्रतिष्ठान सीबीएसई स्कूल), उत्कृष्ट लेखन व संवाद एन. बी. रकटे (विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा), उत्कृषेट दिग्दर्शन- कैलास हिलाले (विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी).‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील छोट्या संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा दिवेश मेदगे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानचे सचिव द. रा. उंडे, विश्वस्त अ‍ॅड. नीलिमा गुजर, श्रीकांत सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. हनुमंत कुबडे व अजय तपकिरे यांनी परीक्षण केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेसाठी मातृपितृ देवो भव, प्लॅस्टिकबंदी योग्य निर्णय, राष्ट्रउभारणीत संतांचे योगदान, सैनिकहो तुमच्यासाठी, हास्यरस जीवनाचे टॉनिक हे विषय देण्यात आले होते.

टॅग्स :Baramatiबारामती