शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

मोशीत दत्ता फुगे यांच्या जावयावर गोळीबार

By admin | Updated: March 16, 2015 04:27 IST

रस्त्यात मोटार थांबवून लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या शिवा गोविंद बोऱ्हाडे (वय २७, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी

पिंपरी : रस्त्यात मोटार थांबवून लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या शिवा गोविंद बोऱ्हाडे (वय २७, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारहाण करून गोळीबार केला. त्यात एक गोळी बोऱ्हाडेंच्या डाव्या हाताच्या दंडाला चाटून गेली आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री आठच्या सुमारास मोशीतील जय गणेश साम्राज्य चौैकाजवळ ही घटना घडली. जखमी तरुण गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा जावई आहे. चिट फंडामुळे गोल्डमॅन दत्ता फुगे अडचणीत आले आहेत. गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गोल्डमॅनसह तिघा जणांवर खडकीत शनिवारी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर रविवारी सायंकाळी जावयावर हल्ला झाला. मोशी प्राधिकरणातील जय गणेश साम्राज्य चौैकाकडून दगडखाणीकडे जात असताना लघुशंकेसाठी बोऱ्हाडे उभे होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सुरुवातीला त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर गोळीबार केला आणि हल्लेखोर पसार झाले. बोऱ्हाडे यांना जखमी अवस्थेत पाहून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली. नागरिकांनी जखमी अवस्थेतील बोऱ्हाडे यांना चिखली स्पाईन रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी उपचारानंतर पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौैजफाटा घटनास्थळी दाखल झाला. उपायुक्त राजेंद्र माने यांनी घटनेचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)