शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमध्ये गोळीबार, आई मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 19:16 IST

स्कॉर्पिओ गाडी जाळणाऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या तयारीत असलेल्या आईवर गोळीबार व मुलावर गोळीबारांसह कोयत्याने वार केला. दोघांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देयाप्रकरणी आठ जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर: गाडी  जाळणाऱ्यांच्या विरोधात पोलीस तक्रार देण्याबाबत आई-मुलामध्ये  बोलणे सुरु असताना आईला  घराबाहेर काढून कपाळावर गोळी झाडली. त्यामध्ये त्या जखमी झाल्या. त्यावेळी  आईला  वाचवण्यासाठी अंगावर धावून जाणाऱ्या  मुलांवर देखील गोळीबार करून कोयत्याने वार केला आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार  हडपसर येथील रामटेकडी येथे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास  घडला.  याप्रकरणी आठ जणांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विक्कीसिंग डिडिसिंग कल्याणी, विकिंसिंग जालिंदरसिंग कल्याणी,माखनसिंग कल्याणी,हुकुमसिंग कल्याणी,खात्रसिंग कल्याणी, सचिन बावरी ,जगदीप कल्याणी, जॉकीसिंग कल्याणी,(सर्व रा. रामटेकडी )अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर उजालासिंग टाक ( वय २४, रामटेकडी) या तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादींची स्कॉर्पिओ गाडी रविवारी रात्री जाळण्यात आली होती. ही गाडी विक्कीसिंग डिडिसिंग कल्याणी व त्याच्या साथीदारांनी जाळल्याचे उजालासिंग टाक ला समजले. त्यानंतर तो आणि त्याची आई यांनी कल्याणी व त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याची फिर्यादीची आई लोकांमध्ये बोलत होती. मंगळवारी रात्री ११च्या सुमारात विक्कीसिंग कल्याणी व त्याच्या इतर साथीदार हातात कोयता व बंदूक घेऊन आले. विक्कीसिंग जालिंदरसिंग कल्याणी यांनी फिर्यादीच्या आईला घराबाहेर काढून तिच्या कपाळावर बंदूक लावली. त्यानंतर बंदुकीची गोळी झाडत जखमी देखील केले. यानंतर उजालासिंग हा वाचवण्यासाठी आला असता त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर उजाळा सिंह यांचे भाऊ बिलूसिंह व ज्वालासिंह यांच्यावर विक्कीसिंग डिडिसिंग कल्याणी याने कोयत्याने वार करून गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहे. 

टॅग्स :HadapsarहडपसरCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे