शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

हंडेवाडीत प्लॉस्टिक गोदामाला आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 09:26 IST

पुणे शहरात मध्यरात्रीनंतर दोन ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या.

पुणे - पुणे शहरात मध्यरात्रीनंतर दोन ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या. हडपसरजवळील हंडेवाडी येथील एका प्लॅस्टिकच्या गोदामाला भीषण आग लागून त्यात गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले. वाघोली येथील मारुतीचे शोरुम रुमला आग लागून त्यात संपूर्ण शोरुम व आतील साहित्य जळून खाक झाले. शिवम प्लॉस्टिक असे या गोदामाचे नाव आहे. हंडेवाडी येथील होळकरवाडी रस्त्यावरील मोकळ्या जागेत हे गोदाम आहे. तेथे दोन रुम असून एका ठिकाणी तेथील कामगार रहातात. या गोदामात प्लॉस्टिकचे ड्रम, मग असे घरगुती वापरासाठी लागणारे प्लॉस्टिकचे साहित्य ठेवण्यात आले होते. अग्निशामक दलाला पहाटे २ वाजून १० मिनिटांनी या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली.  हडपसर व कोंढवा फायर स्टेशनच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत आगीने ऊग्र स्वरुप धारण केले होते़ अग्निशामक दलाने चारही बाजूने पाणी मारुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा परिणाम होत नसल्याचे दिसून आल्यावर त्यांनी फोमचा मारा सुरु केला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश आले. ही आग विझविण्यासाठी तब्बल १० फोमचे डब्बे वापरण्यात आले. तसेच अग्निशामक दलाचे  ५ बंब, पीएमआरडीएचा एक बंब, स्थानिक वॉटर टँकर यांची मदत घेण्यात आली. आगीत गोदामातील सर्व साहित्य तसेच गोदामाचे पत्रे संपूर्णपणे जळून खाक झाले. सकाळी साडेपाच वाजता आग संपूर्णपणे विझविण्यात आली. आगीमागचे नेमके कारण समजू शकले नाही, असे अग्निशामक दलाचे हडपसर स्टेशनचे प्रमुख गोरे यांनी सांगितले. 

टॅग्स :fireआगPuneपुणे