शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

गणेशनगरमध्ये घराला आग, विझविण्यासाठी नगरसेवक सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:59 IST

नगरसेवकाने विझविली आग : लहान मुलगा बचावला

कात्रज : अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांमुळे आपल्या लहान मुलांचा जीवदेखील धोक्यात येऊ शकतो. याचा प्रत्यय आज दुपारी १२.३०च्या सुमारास अप्पर येथील गणेशनगर गल्ली क्रमांक ३ मधील नागरिकांना आला. गणेशनगर गल्ली क्रमांक ३ मधील चाळीत दुसऱ्या मजल्यावर राहणारे रमेश दाभाडे पेंटर काम करतात, त्यांच्या पत्नी सुनीता दाभाडे घरगुती व्यवसाय करतात. कामानिमित्त हे दोघेही बाहेर गेले असता, घरामध्ये त्यांचा पाचवीत शिकणारा मुलगा प्रथमेश दाभाडे बसला होता.

अचानक आग लागल्यामुळे घाबरलेला प्रथमेश जोरात रडू लागला. तो खाली पळाला. चाळीत आरडाओरडा सुरू झाली. त्याच वेळी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल व त्यांचे कार्यकर्ते या घरात शिरले, शेजारच्या मदतीने त्यांनी आगीवर पाणी मारण्यास सुरुवात केली. गॅस टाकी काढून बाहेर टाकण्यात आली. ओसवाल यांनी तातडीने अग्निशामक व पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही आग अजून आतमधील घरात असती, तर अग्निशामक दलाच्या जवानांनादेखील त्या ठिकाणी जाणे जिकिरीचे ठरले असते. आजच्या या घटनेनंतर या भागात अतिक्रमणांमुळे आपला जीव कसा धोक्यात आहे, याची चर्चा होती.कोंढवा-कात्रज येथून तीन गाड्या १० मिनिटांच्या आत दाखल झाल्या; मात्र आग लागलेल्या ठिकाणी गाडीला अतिक्रमणांमुळे जाता आले नाही. सुमारे २०० मीटर पाइप लावून अग्निशामक दलाच्या जवानांनी राहिलेली आग पूर्णपणे विझविली. 

टॅग्स :fireआगPuneपुणे