शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोथरुड येथे धुरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची अग्निशमन दलाकडून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:55 IST

तळमजल्यावरील विद्युत मंडळाच्या मीटरने अचानक पेट घेतल्याने कोथरुडच्या रामबाग कॉलनीतल्या तारांगण सोसायटीत सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली.

ठळक मुद्देजवानांनी इमारतीत राहणाऱ्या सुमारे १५-२० रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले.

पुणे : तळमजल्यावरील विद्युत मंडळाच्या मीटरने अचानक पेट घेतल्याने कोथरुडच्या रामबाग कॉलनीतल्या तारांगण सोसायटीत सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीच्या तीव्रतेमुळे पूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते. त्यात सोसायटीतील नागरिक अडकले होते. त्यात एक ज्येष्ठ महिलेचा समावेश होता. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास ही माहिती मिळाल्यावर काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले. त्यात महिलेची सुटका केली. या घटनेची माहिती एरंडवणा अग्निशमन दलाला मिळाल्यावर घटनास्थळी वाहनासह धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच काही जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला तर दुसरीकडे इतर जवानांनी इमारतीत राहणाऱ्या सुमारे १५-२० रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यास सुरवात केली. त्याचवेळी जवानांना एक ज्येष्ठ महिला मंगला आगरकर (वय ८४) यांना धुरामुळे त्रास होत असून त्या दुसऱ्या मजल्यावर असल्याचे समजले. त्याचवेळी तत्परतेने जवान किशोर बने यांनी आगरकर यांना इतर जवानांच्या साह्याने उचलून खाली आणले. खाली आल्यानंतर आगरकर यांनी सुटकेचा आनंद मानत अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले. त्याचवेळी विद्युत मंडळाचे कर्मचारीसुध्दा  तारांगण सोसायटीत दाखल झाले. आग विझल्याची नोंद घेऊन धोका नसल्याची खात्री करत अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळ सोडले.सदर कामगिरीमधे एरंडवणा अग्निशमन केंद्राचे जवान ज्ञानेश्वर खेडेकर, किशोर बने, कोंडिबा झोरे, प्रविण रणदिवे तर  देवदूत क्विक रिस्पॉन्स टिमचे हेमंत कांबळे, शुभम गोल्हार, राकेश नाईकनवरे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :kothrudकोथरूडfire brigade puneपुणे अग्निशामक दलWomenमहिलाmahavitaranमहावितरण