शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील 'या' टेकडीवर प्लास्टिक टाकल्यास होणार ५०० रूपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 11:38 IST

वन विभाग उचलणार पाऊल; स्वच्छ टेकडीसाठी प्रयत्न

पुणे : म्हातोबा टेकडीवर गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्या उचलण्याचे काम काही नागरिक व लहान मुले करीत आहेत. या प्लास्टिक पिशव्यांमुळे टेकडीवरील जैवविविधता नष्ट होत आहे. त्यामुळे टेकडीवर प्लास्टिक पिशव्यांची बंदी करून जो कोणी ते टाकताना दिसेल, त्यांना ५०० रूपये दंड करण्याचा विचार वन विभाग करत असून, त्यासाठी फलकही लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

प्लास्टिक पिशव्या टेकडीवर पडल्याने त्या मातीत जात आहेत. त्या नष्ट होत नसल्याने तशाच पडून राहतात. परिणामी टेकडीवरील जैवविविधतेला धोका पोचतो. हा विचार करून  स्थानिक नागरिक आभा भागवत त्यांचा मुलगा तुहिन, ओजस हे येथील प्लास्टिक पिशव्या जमा करत आहेत. त्यांनी आतापर्यंत कितीतरी किलो प्लास्टिक संकलित केले आहे. अनेक नागरिक टेकडीवर वृक्षारोपण करतात, त्या रोपांच्या पिशव्या तशाच त्या ठिकाणी टाकतात. तो कचरा तसाच पडून राहतो.

या विषयी वन परीक्षेत्र अधिकारी दीपक म्हणाले,‘‘टेकडीवर प्लास्टिक पिशव्या टाकू नये म्हणून आम्ही ५०० रूपये दंड करण्याचा विचार करत आहोत. तसेचही प्लास्टिकवर बंदीच आहे. त्यामुळे टेकडीवरही कोणी प्लास्टिक टाकताना आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या विषयी टेकडीवर फलक लावण्याचाही विचार आहे.’’

टेकडीवर अनेक नागरिक प्लास्टिक पिशव्या टाकतात. त्या आम्ही संकलित करून संबंधित यंत्रणेला देत आहोत. आताही आम्ही प्लास्टिकच्या जाळ्या जमा केल्या आहेत. त्या खूप जास्त असून, वन विभागाकडून त्या हलविण्यात येणार आहेत. हे प्लास्टिक मातीत रूतत असल्याने येथील मातीही खराब होत आहे.- आभा भागवत, स्थानिक नागरिक 

टॅग्स :Puneपुणेforest departmentवनविभागPlastic banप्लॅस्टिक बंदीenvironmentपर्यावरण