शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील जाळ्यात अडकलेल्या अतिविषारी घोणस जातीच्या नर मादीला इंदापुरात जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 19:31 IST

इंदापूर तालुक्यातील बनकर वाडीतील एका शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागेच्या संरक्षक जाळीत अडकलेल्या दोन अती विषारी सापास प्राध्यापक सोपान भोंग यांनी जीवदान दिले आहे.

ठळक मुद्देडाळिंबाच्या बागेच्या संरक्षक जाळीत अडकलेल्या दोन अती विषारी सापास जीवदान साप हे शेतकऱ्यांचे मित्र असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक

निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यातील बनकर वाडीतील एका शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागेच्या संरक्षक जाळीत अडकलेल्या दोन अती विषारी सापास प्राध्यापक सोपान भोंग यांनी जीवदान दिले आहे.बनकरवाडी येथील तानाजी बनकर यांच्या घराजवळ डाळिंबाच्या बागेला संरक्षक नेटच्या जाळीत साप अडकल्याचे प्रवीण व विकास बनकर या युवकांनी सर्पमित्र प्रा. सोपान भोंग यांना कळविले. भोंग यांनी  तातडीने बनकर वाडीत जाऊन पाहिले असता जाळीमध्ये दोन पूर्ण वाढ झालेले अति विषारी घोणस जातीचे साप असल्याचे सांगितले अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर कात्री ब्लेडच्या साहयाने गुंतलेल्या सापाच्या अंगावरील नायलॉन ची जाळी दूर करून दोन्ही सापास  वाचवून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. सापाविषयी माहिती सांगताना भोंग म्हणाले, की भारतामध्ये आढळणाऱ्यां सापांपैकी घोणस हा  विषारी सर्प आहे. या सापाची लांबी साधारण तीन ते साडे पाच फुटापर्यंत असते. त्याचा रंग तपकिरी किंवा हिरवट रंग असतो. पाठीवर तीन टिपके असतात. स्थूल व आखूड शेपटी त्रिकोणी डोके असते.शेताच्या कंपाऊंडच्या जाळ्यामध्ये अडकून दरवर्षी शेकडो साप मृत्यूमुखी पडतात त्या साठी शेतकऱ्यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. साप हे शेतकऱ्यांचे मित्र असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. म्हणून त्यांना वाचवण्याचे आवाहन भोंग यांनी केले. 

टॅग्स :Puneपुणे