शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटानंतरही वडिलांनी स्विकारली मुलीची आर्थिक जबाबदारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 17:05 IST

सुरेश आणि सुरेखा (नावे बदलली आहेत) २०१२ मध्ये यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला.लग्नानंतर काही दिवस त्यांनी व्यवस्थित संसार केला. काही काळानंतर त्यांच्यात वैचारिक मतभेद होऊ लागले.

ठळक मुद्देमुलीच्या दैनंदिन गरजा आणि शिक्षणासाठी खर्च उदभवल्यास मदत करण्याचेही मान्य

पुणे : घटस्फोट म्हणजे तसा दु:खद अनुभव असतो. त्याचे तीव्र पडसाद आर्थिक, सामाजिक , कौटुंबिक अशा सर्वच पातळीवर दोन्ही बाजूने उमटत असतात. यामध्ये होणारी मुलांची फरफट तर अतिशय केविलवाणी असते. आयुष्यातील विविध प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभे असतात. मात्र, समंतीने घटस्फोट घेऊनही मुलीच्या भवितव्याचा विचार करत तिच्यासाठी गुंतवणूक करून ठेवल्याचा आदर्श एका दाम्पत्याने निर्माण केल्याची दुर्मीळ घटना पुण्यात पाहायला मिळाली.      कौटुंबिक न्यायालयात नुकताच एका उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट झाला. दाखलपूर्व समुदेशनामध्ये दोघांनी त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीच्या भविष्याचा विचार करण्यास लावले. त्यानुसार पतीने घटस्फोटाच्या वेळी पत्नीला १५ लाख रुपये आणि दागिने दिले. तसेच मुलीच्या भवितव्याचा विचार करीत तिच्यासाठी दरमहा आठ हजार रुपये म्युच्युल फंडात गुंतवण्याचे मान्य केले आहे. एवढेच नाही तर पाच वर्षांनंतर मुलीच्या नावे दरमहा १५ हजार रुपये गुंतवण्याचेही पित्याने कबुल केले आहे. जमा झालेले पैसे काढण्याचे अधिकार पत्नी आणि मुलीला देण्यात आला आहे. मुलीच्या दैनंदिन गरजा आणि शिक्षणासाठी खर्च उदभवल्यास चर्चा करून मदत करण्याचेही त्याने मान्य केले आहे. त्यामुळे मुलीचे भवितव्य सुरक्षित बनले आहे. पैशांसाठी तिला कोणावर अवलंबून रहावे लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात नुकताच हा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे यांनी दोघांचे दाखलपूर्व समुपदेशन केले.          सुरेश आणि सुरेखा (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. २०१२ मध्ये त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. सुरेश सैन्यात मेजर असून सध्या बंगळुरू येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. पत्नी सुरेखा ही गृहिणी असून पुण्यात राहते. लग्नानंतर काही दिवस त्यांनी व्यवस्थित संसार केला. दरम्यान, त्यांना एक मुलगी झाली. काही काळानंतर त्यांच्यात वैचारिक मतभेद होऊ लागले. त्यातून वाद विकोपाला गेले. त्यातून आॅगस्ट २०१६ पासून दोघे वेगळे राहु लागले. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अ‍ॅड. कवडे यांच्यामार्फत दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. त्यापूवी कवडे यांनी दोघांचे दाखलपूर्व समुपदेशन केले. कवडे म्हणाले, दोघे एकत्र यावेत यासाठी सुरुवातीला प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यातील मतभेदामुळे ते एकत्र येऊ शकले नसते. त्यामुळे दोघांचा परस्पर संमतीने घटस्फोटाविषयी अर्ज करण्याचे मान्य केले. त्यापूर्वी तीन वर्षाच्या मुलीच्या भवितव्याविषयी विचार करण्यास दोघांना सांगितले. पतीने तिचा आर्थिक भार उचलला पाहिजे. हे दोघांना पटवून दिले. त्यामुळे सुरेश यांनी तिच्या भवितव्यासाठीचा खर्च उचलण्याचे मान्य केले.  ...................

टॅग्स :PuneपुणेDivorceघटस्फोटCourtन्यायालयWomenमहिला