शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लिलाव न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:01 IST

हमीभावात तफावत : शेतकऱ्यांना सोसावे लागतेय नुकसान, पूर्ण क्षमतेने खरेदीसाठी हवीत सक्षम केंद्रे

सासवड : येथील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अडते असोसिएशनने हमीभावात असणाºया तफावतीच्या विरोधात खरेदी व्यवहार बंद ठेवल्याने लिलावच झाला नाही. केंद्र शासनाने १४ पिकांना उत्पादनखर्चाच्या दीड पट हमीभाव जाहीर केला. शेतकºयांकडून या निर्णयाचे स्वागतही झाले; पण केंद्राने जाहीर केलेला हमीभाव शेतकºयांना खात्रीने मिळेल, यासाठी अंमलबजावणी करणारी यंत्रणाच शासनाकडे नाही. शिवाय, शासकीय धान्य खरेदी केंद्रे कधीही वेळेवर सुरू झाली नाहीत, त्यांच्या नियोजनात सुसूत्रता नाही. अशा स्थितीत जाहीर झालेला हमीभाव शेतकºयांना मिळणार कसा, हा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

एकीकडे शासनाच्या हमीभावाच्या दरात माल खरेदी करायचा, तर दुसरीकडे कंपन्यांनी तोच माल हजार ते पंधराशे रुपयांच्या कमी भावात विकत घ्यायचा, या दुष्टचक्रात व्यापारी अडकले असून, त्यातून सोडवणूक करायची कशी, हा प्रश्न त्यांच्यासमोरदेखील निर्माण झालेला आहे. या दुष्टचक्रातून पयार्याने शेतकरी नाडला जात असून शेतकºयांचे प्रचंड नुकसान होऊ लागलेले आहे. त्यामुळे यात शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून हमीभावाची तफावत दूर करण्याची मागणी शेतकरी, व्यापारी व सर्व स्तरांतून होत असल्याचे दिसून येते.पुरंदर तालुक्यातील अनेक गावांतून लिलाव असल्याने अनेक शेतकºयांनी आपला माल विक्रीसाठी गहू, ज्वारी, मका तसेच सोयाबीन आणले असताना लिलाव न झाल्याने अनेक शेतकºयांना गाडीचे भाडे द्यावे लागले. त्यामुळे आर्थिक नुकसानदेखील सोसावे लागले.यामुळे शेतकºयांत प्रचंड नाराजी उमटली. या वेळी पुरंदर तालुका तसेच सासवड शहर अडते असोसिएशनच्या वतीने माल खरेदी न करण्याची आपली भूमिका ज्येष्ठ व्यापारी रूपचंद कांडगे यांनी स्पष्ट केली. या प्रसंगी संजय चव्हाण, नंदकुमार महाजन, विनीत जाळींद्रे, जितेंद्र महाजन, संतोष चिंचकर तसेच बिरदीचंद नवलखा हे उपस्थित होते.४शेतकºयांनी उत्पादित केलेला माल पूर्ण क्षमतेने शासनाची खरेदी केंद्रे खरेदी करू शकत नाहीत, हे वास्तव आहे. व्यापाºयांना शासनाच्या हमीभावात माल खरेदी करणे परवडत नाही. पर्यायाने शेतकºयांनाच नुकसान सोसावे लागते. त्यामुळे शासनाने खासगी व्यापाºयांच्या खरेदीचा भाव व हमीभावातील फरकाची रक्कम शेतकºयांना अनुदान म्हणून द्यावी, अशी मागणी पुरंदर तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी