शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

मार्केट यार्डातील चिखलामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:17 IST

गुलटेकडी मार्केट यार्डाच्या फळे, कांदा-बटाटा, भाजीपाला विभागातील काही गाळ्यासमोर पाणी, चिखल व राडारोडा साचत आहे. परिणामी काही भाज्यांना चिखल लागत असून शेतीमालाचा दर्जा खराब होत आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

पुणे - गुलटेकडी मार्केट यार्डाच्या फळे, कांदा-बटाटा, भाजीपाला विभागातील काही गाळ्यासमोर पाणी, चिखल व राडारोडा साचत आहे. परिणामी काही भाज्यांना चिखल लागत असून शेतीमालाचा दर्जा खराब होत आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, बाजार समितीने मार्केट यार्ड परिसरातील नालेसफाई केली असल्याचा दावा केला आहे. मात्र, पहिल्याच मोठ्या पावसात नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचे उघड झाले.मार्केट यार्डात गेल्या दोन वर्षांपासून नालेसफाईची कामे झाली नव्हती. यंदा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ही कामे हाती घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, पहिल्याच पावसात हा दावा फोल ठरला. शनिवारी झालेल्या पावसामुळे मार्केट यार्डात गाळ्यांसमोर पावसाचे पाणी साचले. रविवारी शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने गाळ्यासमोरील चिखलात शेतमाल उतरावा लागला. त्यामुळे शेतमाल भिजून चिखलाने खराब झाला होता. परिणामी शेतमालाला कमी दर मिळाला.दरम्यान, गेल्या वर्षी बाजार समितीकडून काही ठराविक गाळ्यांसमोर बांधण्यात आलेले अनधिकृत कठडे पाडण्यात आले होते. मात्र, उर्वरित कठडे तसेच असल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून चिखल होत आहे. त्यामुळे अडथळा ठरणारे कठडे बाजार समिती प्रशासनाकडून काढले जाणार का? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.बाजारातील काही रस्ते खराब झाले आहेत. कमी पाऊस झाल्यानंतर या रस्त्यावर चिखल होतो. रस्त्यांचे डांबरीकरण होत नाही तोपर्यंत पावसात या रस्त्यांवर काहीसा चिखल होईल. काही विभागातील डांबरीकरणाची कामे लवकरच केली जातील.- बी. जे. देशमुख,प्रशासक, बाजार समितीभेंडी, गवार, फ्लॉवरचे दर घसरलेपुणे : महिनाभरापासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतमालाचे उत्पादन वाढू लागले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढत आहे. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने भेंडी, गवार, दोडका, फ्लॉवर, पावटा, मटार, आले, काकडीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. या भाज्या वगळता इतर सर्व फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.रविवारी मार्केट यार्डात सुमारे १७० ते १८० ट्रकइतकी शेतमालाची आवक झाली. त्यात परराज्यातून हिमाचल प्रदेशामधून २ ट्रक मटार, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून ४ ते ५ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून ४ ते ५ टेम्पो शेवगा, इंदोर येथून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ ते ६ टेम्पो, बेंगलोर आले १ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली.त्याचप्रमाणे स्थानिक भागातून सातारी आल्याची २ हजार २०० पोती, टॉमेटो ४ हजार ५०० ते ५ हजार क्रेट्स, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी ८ ते १० टेम्पो, भेंडी ८ ते १० टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, भुईमूग शेंग २०० पोती, कांदा १०० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाटा ६० ट्रक इतकी आवक झाली, असे अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.दरम्यान, आवक वाढल्याने फळभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. पावसाचा जोर अधिक वाढल्यास भाजीपाल्याच्या दरात आणखी घट होईल, अशी शक्यता व्यापाºयांकडून व्यक्त केली जात आहे.पालेभाज्या झाल्या स्वस्तपुणे : पावसामुळे पालेभाज्यांसाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी पालेभाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची दुप्पट आवक झाली. बाजारात कोथिंबिरीची २ लाख जुडी, तर मेथीची ५० हजार जुडी इतकी आवक झाली. त्यामुळे कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात आदी पालेभाज्यांच्या दरात शेकडा जुडीमागे ५०० ते ८०० रुपयांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे सर्व पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. पालेभाज्यांचे शेकडा जुडीचे दर असे : कोथिंबीर : ३००-७००, मेथी : ५००-८००, शेपू : ३००-६००, कांदापात : ७००-१०००, चाकवत : ४००-५००, करडई : ३००-४००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ४००-५००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ३००-४००, चुका : ७००-८००, चवळई : ४००-५००, पालक : ३००-४००.लिंबू, मोसंबी, संत्राचे दर घटलेपुणे : गुलटेकडी परिसरातील श्री छत्रपती मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी सर्वच फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. मोसंबी, संत्रा, लिंबू यांची आवक वाढल्याने दरात घट झाली. तसेच पपई आणि खरबुजाची आवक घट झाल्याने त्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी मार्केट यार्डमधील फळबाजारात अननसाची २ ट्रक, मोसंबीची १० टन, संत्री ५०० किलो, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई ७ ते ८ टेम्पोे, लिंबाची ४ ते ५ हजार गोणी, चिक्कू २०० बॉक्स, पेरु २०० क्रेटस्, कलिंगड ७ टेम्पो, खरबुज ३ ते ५ टेम्पो, सीताफळ २ टन, तर आंब्याची १ ते ३ टनइतकी आवक झाली, असे व्यापाºयांनी सांगितले. फळांचे दर असे : लिंबू (प्रतिगोणी) : ३०-५०, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १५०-३००, (४ डझन) : ६०-१३०, संत्रा : (३ डझन) २५०-४००, (४ डझन) : १५०-२५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-७०, गणेश ५-३०, आरक्ता १०-४०, कलिंगड : ५-१०, खरबुज : २५-३०, पपई : १५-२०, चिक्कू : २००-५००, पेरु (२० किलो) : ४००-५००, सीताफळ : २०-१५०, कर्नाटक आंबा : २०-३०, लालबाग : १०-१२, तोतापुरी : १२-१५, नीलम : १०-१२, बदाम : १०-१५, लंगडा ३००-५००, दशहरा (६ किलो) ३५०-५५०.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी