शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू, आजपासून आॅनलाइन अर्ज, २८ फेब्रुवारी अंतिम मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:16 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी शनिवापासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी शनिवापासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. लॉटरी पद्धतीने प्रवेशाची पहिली यादी जाहीर करणे, प्रवेश घेणे व प्रवेशाच्या पुढील फेºया आदींचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.आरटीईअंतर्गत गरीब घरातील मुलांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे यासाठी सर्व शाळांमधील २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जात आहेत. या प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविली जाते. विद्यार्थ्यांच्या पालकांना ६६६.२३४ीिल्ल३.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे, असे प्राथमिक विभागाचे उपसंचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.दरवर्षी आरटीई प्रवेशासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी यंदा जानेवारीपासूनच ही प्रक्रिया राबविण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळांनी आरटीई अंतर्गत नाव नोंदणी करण्यास टाळाटाळ केल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. आरटीई प्रवेशाच्या ३ फेºयांचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले होते, मात्र त्यामध्ये आता बदल झाला आहे.पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी पालकांना १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज करता येईल. त्यानंतर लॉटरी पद्धतीने प्रवेशाची यादी जाहीर केली जाईल. पालकांना शाळेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली जाईल. त्यानंतर उर्वरित जागांच्या प्रवेशासाठी पुढील फेºयांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे अशी माहिती गोसावी यांनी दिली.शाळांनी नोंदणी करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली असतानाही खूप कमी शाळांनी नोंदणी केली होती. अखेर शिक्षण विभागाने शाळांची नोंदणी करून घेतली आहे. त्यामुळे राज्यातील ९ हजार १०० शाळांमधील १ लाख ३५ हजार प्रवेशाच्या जागा झाल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे