पिंपरी : शिक्षण मंडळ सभापती फजल शेख, उपसभापती सविता खुळे यांनी पदाचे राजीनामे द्यावेत, अशी जोरदार मागणी सदस्यांकडून केली जात होती. शेख आणि खुळे यांनी पदाचे राजीनामे सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्याकडे सादर केले. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडला. शिक्षण मंडळ सभापतिपदाचा कालावधी १७ आॅक्टोबर २०१४ ला संपुष्टात आला आहे. सभापती फजल शेख आणि उपसभापती सविता खुळे यांची एक वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने त्या पदांवर अन्य सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी. या उद्देशाने ८ सदस्यांनी शिक्षण मंडळ सभापती, उपसभापतिपदाची निवड प्रक्रिया राबविण्याची मागणी सुरू केली. लता ओव्हाळ, विजय लोखंडे, धनंजय भालेकर, निवृत्ती शिंदे, चेतन घुले, शिरीष जाधव, जगन्नाथ शिवले, चेतन भुजबळ या सदस्यांनी तेव्हापासून राजीनामा मागणीचा पाठपुरावा केला. एवढेच नव्हे तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी दाद मागितली. मुदत संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी इतरांना संधी द्यावी, या मागणीचा आग्रह धरला. त्याची दखल घेत पवार यांनी त्यांना राजीनामे देण्याची सूचना केली. (प्रतिनिधी)
अखेर सभापतींचा राजीनामा
By admin | Updated: January 16, 2015 03:01 IST