शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

...अखेर बारामती तालुक्यातील शिरसाई उपसामधून पाण्याचे आवर्तन सोडले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 2:35 PM

पाण्याचा उपसा वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला आहे.

 उंडवडी कडेपठार : अखेर शिरसाई उपसा सिंचन योजनेतून ६ पंपाद्वारे मंगळवारी (दि. २५) आवर्तन सोडण्यात आले आहे. मे महिन्याच्या सुरवातीला उंडवडी कडेपठार ग्रामपंचायतीचे सरपंच भरत बनकर,उपसरपंच भुषण जराड यांनी आवर्तन सुरु होण्यासाठी पत्रव्यवहार करुन वेळोवेळी पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सरपंच,उपसरपंच यांनी सांगितले.

शिर्सुफळ तलावातून डाव्या कालवा व उजव्या कालवा अशा दोन कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून आठ-दहा दिवस पाणी चालू असणार आहे.डाव्या कालव्याला ३ पंपांद्वारे व उजव्या कालव्याला ३ पंपाद्वारे पाणी सोडण्यात आले.उजव्या कालव्यातून  सोनवडी,जळगाव,अंजनगाव,कारखेल तर डाव्या कालव्यातून उंडवडीकडेपठार,जराडवाडी,गोजुबावी,ब-हाणपुर,उंडवडी सुपे या गावांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.जिरायती भागात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला होता.डिसेंबरनंतर रब्बी हंगामात बागायत क्षेत्रात वाढ होऊन पीक रचना बदलली.त्यामुळे पाण्याचा उपसा वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला आहे.यामुळे सध्या पाण्याअभावी भूईमुग,मका,कडबा इतर पिके जळुन जाण्याच्या मार्गावर होती.त्याचबरोबर ग्रामस्थांनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.शिरसाईचे आर्वतन सुरु झाल्याने शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लाभार्थी क्षेत्रातील बळीराजाला २२,५०० रुपये पर एम.सी.एफ.टी. दराने ५० टक्केहून अधिक प्रमाणात पाणी मिळणार आहे.मागील थकीत पाणीकराच्या ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावयाची आहे.

तसेच चालू पाण्याची १०० टक्के रक्कम भरल्यावरच पाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेला ७ नंबरचा फॉर्म भरुन पाण्याची मागणी करुन सहकार्य करावे,अशी विनंती पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमोल शिंदे यांनी केली आहे.-----------------

टॅग्स :BaramatiबारामतीWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती