शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर व्हीएमडी प्रकरणी स्मार्ट सिटीला नोटीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 20:23 IST

व्हीएमडी पोल उभारण्याचे काम त्वरीत थांबवा व नियमबाह्य पोल काढून टाकण्याचे आदेश...

ठळक मुद्देमहापालिकेच्या जाहीरात नियमावली व वाहतूकीचे सर्व नियम धाब्यावर बसून बोर्डची उभारणा स्मार्ट सिटीच्या नियमबाह्य कामांचा लेखाजोखाच सभागृहासमोर

पुणे: स्मार्ट सिटी अतंर्गत शहरात बसविण्यात आलेल्या वाय.फाय व्ही.एम.डी (व्हेरिएबले मॅसेज डिस्प्ले) पोल बसविताना मोठ्या प्रमाणात अनियमित झाली असून,याबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. याबाबत संबंधित लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लि. कंपनीला खुलासा करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, कंपनीकडून कोणताही खुलासा देण्यात आला नाही. याबाबत अखेर महापालिकेच्या वतीने शुक्रवारी स्मार्ट सिटीलाच नोटीस काढली असून व्हीएमडी पोल बसविण्याचे काम त्वरीत थांबविण्याचे व नियमबाह्य पोल काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. स्मार्ट सिटीने पोल न काढल्यास महापालिकेकडून हे पोल काढण्यात येतील, असे देखील स्पष्ट करण्यात आले.  स्मार्ट सिटी अंतर्गत संपूर्ण शहरात विविध ठिकाणी व्ही.एम.डी (व्हेरिएबले मॅसेज डिस्प्ले) बोर्ड उभारण्यात आले आहेत. यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कोणत्याही स्वरुपाची परवानगी घेतली नाही. महापालिकेच्या जाहीरात नियमावली व वाहतूकीचे सर्व नियम धाब्यावर बसून बोर्डची उभारणा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत समोर आली. याबाबत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून स्मार्ट सिटीवर वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई देखील करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. नगरसेवक अविनाश बागवे यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नावर सभागृहात चर्चा करण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटीच्या नियमबाह्य कामांचा लेखाजोखाच सभागृहासमोर आला.सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांनी देखील शुक्रवारी तातडीने स्मार्ट सिटीला नोटीस काढून व्हीएमडी पोल बसविण्याचे काम त्वरीत थांबविण्याचे आदेश दिले. तसेच आता पर्यंत उभारण्यात आलेल्या व्हीएमडी पूल महापालिकेच्या जाहिरात व फलक नियंत्रण नियम २००३ चे तरतुदीचे पालक करीत नसल्यास असे सर्व पोल देखील त्वरीत काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीकडून ही कारवाई न झाल्यास महापालिका आपली यंत्रणा लावून नियमबाह्य पोल काढून टाकेल असे नोटीसेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSaurabh Raoसौरभ राव