शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! अखेर १ हजार ८१४ कोटी रुपयांत लवासाच्या विक्रीला मंजुरी

By नितीन चौधरी | Updated: July 22, 2023 18:46 IST

म्हणून मिळणार ‘डार्विन’कडे लवासाचा ताबा...

पुणे : मुळशी तालुक्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पाला विकत घेण्याच्या मुंबईस्थित डार्विन ग्रुपच्या प्रस्तावाला अखेर राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे अडचणीत आलेला हा प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार असून, हजारो गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला. मुंबईतील डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप कंपनीने मुळशी तालुक्यातील लवासा सिटी या भारतातील पहिल्या खासगी हिल स्टेशन प्रकल्पाच्या विकासासाठी तयार केलेल्या ठरावाला अंतिम मंजुरी दिली.

दिवाळखोरी संपुष्टात

खंडपीठाचे सदस्य कुलदीप कुमार करीर आणि तांत्रिक सदस्य श्याम बाबू गौतम यांनी हा निर्णय दिला. लवासा कॉर्पोरेशन विरुद्ध २०१८ मध्ये प्रकल्पाच्या ऑपरेशनल क्रेडिटर्सद्वारे दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आता या निर्णयामुळे ही दिवाळखोरी संपुष्टात आली असून, प्रकल्पाच्या पुढील टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

म्हणून मिळणार ‘डार्विन’कडे लवासाचा ताबाडार्विन कंपनीने २०२१ मध्ये लवासा कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी १ हजार ८१४ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यावर कमिटी ऑफ क्रेडिटर्सने शिक्कामोर्तब केल्यानंतरही लवासा दिवाळखोरीत असल्याने एनसीएलटीची मंजुरी आवश्यक होती. त्यामुळे डार्विन कंपनीला लवासाचा ताबा मिळाला नव्हता. डार्विन कंपनीचा प्रस्ताव नियमांनुसार आवश्यक वैधानिक पूर्तता करतो. त्याला मान्यता देण्यात येत असल्याचे खंडपीठाने दिलेल्या २५ पानी आदेशात म्हटले आहे.

घर खरेदीदारांना मिळणार ४३८ काेटी रुपयांची भरपाईडार्विन कंपनी येत्या आठ वर्षांमध्ये १ हजार ८१४ कोटी रुपयांची भरपाई करणार आहे. त्यात बँकांना ९२९ कोटी रुपयांचा समावेश असून, घर खरेदीदारांना ४३८ कोटी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहेत. दिवाळखोरी तज्ज्ञांच्या मते, मुळशी तालुक्यातील १८ गावांमधील १२ हजार ५०० एकरांमध्ये पसरलेल्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी पुढील ८ ते १० वर्षे लागू शकतात.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड