शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘फिल्मी स्टाइल’ एँट्री, एफटीआयआयमध्ये अनुपम खेर : सशक्त ‘अभिनया’चे विद्यार्थ्यांना घडले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 03:53 IST

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊन काही दिवसच उलटले असताना, अनुपम खेर यांनी प्रशासन आणि विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता संस्थेमध्ये सोमवारी फिल्मी स्टाईल अचानक ‘एंट्री’ केली. मेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमवेत लंच करून, संस्थेतील कर्मचाºयांना जवळ घेत ‘तुम्हाला काय वाटतंय मी काम ...

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊन काही दिवसच उलटले असताना, अनुपम खेर यांनी प्रशासन आणि विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता संस्थेमध्ये सोमवारी फिल्मी स्टाईल अचानक ‘एंट्री’ केली. मेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमवेत लंच करून, संस्थेतील कर्मचाºयांना जवळ घेत ‘तुम्हाला काय वाटतंय मी काम करू शकेन का?’ अशी विचारणा करीत आपल्या सशक्त ‘अभिनया’चे दर्शन सर्वांना घडविले.सुमारे चाळीस वर्षांपूर्वी एफटीआयआयमध्ये विद्यार्थी म्हणून आलो होतो, ते दिवस आजही आठवतात. अजूनही ‘विद्यार्थी’ असल्यासारखेच वाटते. विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यासाठी येतात, त्यामुळे त्यांचे प्रश्न जाणून घेणे आणि ते सोडविणे महत्त्वाचे आहे. मी खूप सकारात्मक वृत्तीने आज संस्थेमध्ये आलो आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचा माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले. एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी सोशल मीडियावरील विविध वक्तव्यांमधून अनुपम खेर चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे ते भाजपाचे प्रवक्तेच असल्यासारखे वाटते, ते हिंदू राष्ट्रवादी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. खेर यांच्या नियुक्तीनंतर सध्या एफटीआयआय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या होणाºया गळचेपीबाबत स्टुडन्ट असोसिएशनने पत्राद्वारे त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर खेर यांनी एफटीआयआयला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी त्यांचे प्रश्न जाणून घेतले. चौहान यांना विद्यार्थ्यांनी केलेला विरोध पाहता अत्यंत सहकार्याच्या आणि मवाळ भूमिकेतून ते विद्यार्थ्यांशी चर्चा करीत होते. दुपारची जेवणाची वेळ असल्याने त्यांनी तडक मेस गाठली आणि विद्यार्थ्यांसमवेत जेवणाचा आनंद लुटला. आज सकाळी अभिनय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा मास्टर क्लास घेतल्यानंतर, ते पुनश्च स्टुडन्ट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणार असल्याचे खेर यांनी स्पष्ट केले.कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’ चा हा मुद्दा माध्यमांनीच काढला आहे. दोन वर्षांनी बघू काय होतंय ते. मी इथे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आलो आहे. विद्यार्थ्यांशी जी चर्चा केली आहे, ती प्रशासन आणि नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये मांडण्याचा निश्चितप्रयत्न करीन.- अनुपम खेर, अध्यक्ष, नियामक मंडळ एफटीआयआयअनुपम खेर यांनी एक सकारात्मक पाऊल पुढे टाकले आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी आमच्यासाठी चर्चा केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. आता ते जे बोलतात ते करून दाखवतात का, हा प्रश्न आहे.- रोहितकुमार, जनरल सेक्रेटरी, स्टुडन्ट असोसिएशन एफटीआयआय 

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेरPuneपुणे