शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमधीव राडारोडाप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 12:11 IST

पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे राडारोडा टाकल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुरुवारी चत:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देज्या कर्मचाऱ्याने पैसे घेऊन राडारोडा टाकायला लावला त्याच्याविरुद्ध अद्याप कारवाई नाहीचतु:शृंगी पोलीस ठाण्यात कलम ४२६, ४३१, ४४७, १०९ नुसार गुन्हा दाखल

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे राडारोडा टाकल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुरुवारी चत:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ज्या कर्मचाऱ्याने पैसे घेऊन हा राडारोडा विद्यापीठात टाकायला लावला त्याच्याविरुद्ध अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बुधवारी दुपारी राडारोडा भरलेले ७ ट्रक गस्तीवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी पकडले होते. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अजित जाधव (वय ४०, रा. मॉडेल कॉलनी) व ७ ट्रक चालकांविरुद्ध कलम ४२६, ४३१, ४४७, १०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गोखलेनगर येथील म्हाडा कॉलनीतील राडारोडा विद्यापीठ कॅम्पसमध्ये टाकण्यासाठी आणण्यात आला होता. विद्यापीठातील एका कर्मचाºयाने पैसे घेऊन हा राडारोडा टाकण्यास लावल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी स्थावर विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी कोणताही राडारोडा मागविला नसल्याचे तसेच त्या ७ ट्रकशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले होते. सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. शिंदे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हविद्यापीठात राडारोडा कोणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आला हे बुधवारीच निष्पन्न झाले असताना,  त्या कर्मचाºयाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देण्याचे विद्यापीठाने टाळले आहे. आम्ही अजून त्याचा शोध घेत असून, एक-दोन दिवसात त्याचा छडा लावू, अशी भूमिका विद्यापीठाकडून घेण्यात आली आहे.

सहभागी कर्मचाऱ्यांना निलंबित करासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राडारोडा टाकल्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करा अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, परिवर्तन संस्थेचे अनिकेत राठी यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे.

कोणालाही पाठीशी घालणार नाहीविद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडून राडारोडा टाकल्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. एक-दोन दिवसात त्याचा शोध लावू. विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी काही फेरबदल करण्यात येत आहेत. - सुरेश भोसले, संचालक, सुरक्षा विभाग

कोणालाही पाठीशी घालणार नाहीविद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडून राडारोडा टाकल्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. एक-दोन दिवसात त्याचा शोध लावू. विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी काही फेरबदल करण्यात येत आहेत. - सुरेश भोसले, संचालक, सुरक्षा विभाग

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे