शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

महेश मोतेवारच्या मुलासह चौघांवर दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:29 IST

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन मल्टिपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि.चे प्रमुख महेश मोतेवार यांच्या मुलासह चौघांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे.

पुणे - गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समृद्ध जीवन मल्टिपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि.चे प्रमुख महेश मोतेवार यांच्या मुलासह चौघांवर दोषारोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र सादर केले आहे.अभिषेक महेश मोतेवार (वय २१, रा. गणराल हाईट्स, बालाजीनगर, धनकवडी) असे महेश मोतेवार यांच्या मुलाचे नाव असून त्यांच्यासह भाचा प्रसाद किशोर पारसवार (वय ३२, रा. कृष्णामाई सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी), महेंद्र वसंत गाडे आणि सुनीता किसन थोरात अशा चौघांवर हे दोषारोपपत्र दाखल केले आहे. तब्बल ७ हजार २१२ पानांचा समावेश असलेल्या या दोषारोपपत्रात तपासाचे अनेक मुद्दे मांडले आहेत.या प्रकरणातील मुख्य आरोपी महेश मोतेवार व त्यांची पत्नी लीना या दोघांना यापूर्वीच अटक केली आहे. सध्या ते दोघेही तुरुंगात आहेत. फसवणुकीच्या या प्रकरणात आतापर्यंत सुमारे २० जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. किरण शांतिकुमार दीक्षित (वय ५३, रा. दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. मोतेवार व त्यांच्या सहकाऱ्यानी गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने हजारोंची फसवणूक केली. ३० जुलै २०१५ ते २८ सप्टेंबर २०१६ या कालावधीत समृद्ध जीवन मल्टिपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी लि. या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या रकमेचा संचालकांनी बेकायदेशीररीत्या ३० जुलै २०१५ ते २८ सप्टेंबर २०१६ या कालावधीत कायद्यासाठी अपहार करून फिर्यादीसह इतरंचा गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सोसायटीकडे विश्वासाने गुंतवणूक केलेल्या रकमेचा अपहार केला. या गुन्ह्यात तब्बल २ कोटी १८ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक झाली. अभिषेक महेश मोतेवारांचा मुलगा आहे. वैशाली मोतेवार यांनी मुलाच्या मदतीने समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर मल्टिस्टेट नागरिकांकडून पैसे घेतले; पंरतु त्याचा मोबदला दिला नाही.मोतेवार यांच्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया कंपनीला सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारण्यास बंदी घातली. त्यावेळी सोसायटीमार्फ त गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारण्यात आली होती. याप्रकरणी भादंवि कलम ४०९, ४०६, १२० (ब), ४२०, ३४ तसेच महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या ज्योती क्षीरसागर यांनी हे आरोपपत्र दाखल केले.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे