शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Jayanti 2022: पुण्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमात स्पीकरच्या भिंती उभारणाऱ्या मंडळावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 13:36 IST

शिवजयंतीच्या कार्यक्रमात डीजे लावण्यासाठी पोलीस परवानगी देत नाहीत म्हणून विश्रांतवाडी येथील एका मंडळाने थेट येथील भर रस्त्याच अडवला

येरवडा : कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आल्यानंतर सार्वजनिक सण-उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे सुरू करण्यात आलेले आहेत. महापुरुषांच्या जयंतीसाठी शासनाने यापूर्वीच नियमावली केलेली असून स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी मिळाल्याशिवाय मिरवणूक किंवा स्पीकर लावता येत नाहीत. परंतु पुण्यात विश्रांतवाडी येथील एका मंडळाने शिवजयंती निमित्त पोलिसांची परवानगी नसतानाही स्पीकरच्या भिंती उभारल्या होत्या. त्यामुळे या मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मात्र या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार सुनील टिंगरे व काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यावर स्पीकरच्या भिंती खाली उतरवून कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी शिवजयंतीनिमित्त विश्रांतवाडी येथील एका मंडळाने डीजेसह स्पीकरच्या भिंती उभ्या करत जागेवरच सजावट केली होती. विश्रांतवाडी पोलिसांनी डीजेच्या भिंती उभ्या करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे स्पीकर बंद करून कार्यक्रम थांबवला. मंडळाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट वाहतुकीचा रस्ता मुख्य रस्ताच बंद केला. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डीजेच्या भिंती उभ्या करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे स्पीकर बंद करावा  लागेल असा पवित्रा पोलिसांनी घेतला होता. तर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत  इतर सर्व काही "आलबेल" असताना त्याकडे पोलिस लक्ष देत नाहीत,   फक्त शिवजयंतीच्याच  कार्यक्रमासाठी स्पीकर व डीजेला  परवानगी का दिली जात नाही? असा संतप्त सवाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला

या सर्व परिस्थितीमुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यस्थी करीत मंडळाचे कार्यकर्ते व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय घडवून आणला. महापुरुषांच्या जयंत्या तसेच मिरवणुका नियमानुसार झाल्याच पाहिजेत. परवानगीसाठी काही अडचण असेल तर या पुढील काळात मी स्वतः पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीन. पोलीस परवानगी घेऊन सर्व जयंत्या व सण-उत्सव या पुढील काळात देखील उत्साहात साजरे करण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Vishrantwadiविश्रांतवाडीPoliceपोलिसmusicसंगीतShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज