शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

रस्त्यावर उतरून नव्हे, तर चक्री उपोषणातून लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:30 AM

मराठा समाजास आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरिता आतापर्यंत राज्यभर ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या सकल मराठा समाजाकडून पुढील काळात लढा सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठा समाजास आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीकरिता आतापर्यंत राज्यभर ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या सकल मराठा समाजाकडून पुढील काळात लढा सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आता रस्त्यावर उतरून नव्हे, तर येत्या २० आॅगस्टपासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर (कौन्सिल हॉल) बेमुदत चक्री उपोषणाला बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाज यांचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.औरंगाबाद येथे समन्वयकांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सोमवारी (दि. २०) दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चक्री उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या काळात आत्महत्या करणाºया आंदोलकांच्या कुटुंबीयांस नुकसानभरपाई मिळावी, शासकीय नोकरी द्यावी, आंदोलकांविरुद्ध दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, यांसारख्या १५ मागण्यांकरिता बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनाला गालबोट लागल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.याविषयी स्पष्टीकरण देताना पदाधिकाºयांनी आंदोलनात बाह्यशक्तींचा शिरकाव झाल्याने शांततेतील मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. पोलीस प्रशासनाकडून त्याचा तपास होत असून त्यामागील सूत्रधाराचा शोध घेतला जाईल.आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या व्यक्तींची काळजी समाजबांधवांकडून घेतली जाणार आहे. येत्या दहा ते बारा दिवसांत औरंगाबाद येथे पुन्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल, असे याप्रसंगी सांगण्यात आले.गेल्या काही दिवसांत मुंबईसह औरंगाबाद, चाकण, कळंबोली, नवी मुंबई आदी परिसरात जाणीवपूर्वक दंगली घडविण्यात आल्या असून त्यात कोण सहभागी होते, याचा शोध घेण्याची गरज आहे. मात्र याविषयी शासनाची गुप्तचर यंत्रणेला अपयश आले आहे, अशी टीका समितीच्या वतीने करण्यात आली.या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, धनंजय जाधव, हनमंत मोटे, किशोर मोरे, विराज तावरे, प्रशांत धुमाळ, सचिन आडेकर, युवराज दिसले, गणेश मापारी, मीना जाधव उपस्थित होते.आचारसंहितेचे फलक उभारणारआंदोलनात सहभागी होणाºयांसाठी आचारसंहिता तयार करण्यात आली असून, यात आंदोलनादरम्यान शांतता बाळगावी, कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, आंदोलनाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागेल अशा प्रकारची कृती करू नये, कुठल्याही राजकीय पक्ष, संघटना यांचा सहभाग मोर्चात असणार नाही, याशिवाय मोर्चादरम्यान रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या बाटल्या यांची योग्य विल्हेवाट लावावी, आदी सूचनांचा समावेश असून, शहरभरात त्याचे मोठे फलक लावण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा