शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

सोशल मीडियाच्या जमान्यात पुस्तकांचा लढा

By admin | Updated: January 19, 2016 01:33 IST

तरुणांवर सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढला आहे, की चिरकाल अस्तित्व टिकविण्यासाठी पुस्तकांना आज सोशल मीडियाशी लढा करावा लागत आहे. तरुणांचे लेखन तुटपुंजे

सुवर्णा नवले,  ज्ञानोबा तुकारामनगरी (पिंपरी)तरुणांवर सोशल मीडियाचा प्रभाव इतका वाढला आहे, की चिरकाल अस्तित्व टिकविण्यासाठी पुस्तकांना आज सोशल मीडियाशी लढा करावा लागत आहे. तरुणांचे लेखन तुटपुंजे आणि प्रभावहीन आहे, असा सूर ‘आजची तरुणाई काय वाचते, काय लिहिते?’ या तरुणाईवर आधारित मौलिक परिसंवादात पार पडला.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपमंडपात हा परिसंवाद झाला. त्यात श्रीपाद अपराजित, राजन खान, कैलास इंगळे, दीपक पवार, जुई कुलकर्णी, राजेंद्र मुंडे सहभागी झाले होते. प्रतीक पुरी यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर परिसंवादात कार्यक्रमाचे अध्यक्ष अपराजित म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनात तरुणांची खाद्यान्नाची रांग दिसली. त्यावरून ती रांग साहित्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे, असे वाटते. नवीन पिढीत परिपक्वता आहे. मात्र, नव्या पिढीचे लेखन पुस्तकविक्रीच्या दृष्टिकोनातून होत आहे. त्यासाठी नव्या पिढीला व्यक्त होणे गरजेचे आहे.’’ राजन खान सडेतोड भाषेत तरुणाईवर बोलले. लेखक तरुण की वयस्कर, यावर त्या लेखकाचा नवोदितपणा अवलंबून नसतो. त्यामुळे लिखाण करणारा कोणीही असो, तो तरुण आणि नवोदितच असतो. आजच्या तरुणाचे लेखन भरीव नाही. सोशल मीडियावर लिखाण केले असता, कोणीही या शिंतोडे मारून जा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुस्तकांना स्वतंत्र ओळख आहे. तशी स्वतंत्र ओळख सोशल मीडियाच्या जमान्यात ब्लॉगलाही नाही. आजही लिखाण जाती-पातींत अडकून आहे. सध्या लिखाण आत्मकेंद्री झाले आहे. स्वत:चा प्रभाव पडेल, असा एकही लेखक समाजात नाही. सध्याच्या तरुणांच्या जाणिवा बधिर झाल्या आहेत. साहित्यात स्वत:च्या नावाची ओळख निर्माण करावी लागते. काहीही झाले तरीही वाचनसंस्कृती मरत नाही. नव्या पिढीला चांगल्या मूल्यांचे व नीतीचे स्वप्न पडण्याची गरज आहे.’’