शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच हजार पुणेकरांची केली ऑनलाईन फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 02:17 IST

हॅकर्सनी घातला कोट्यवधींना गंडा; पोलिसांनी मिळवून दिले ४ कोटी परत

- विवेक भुसे पुणे : बँकेतून बोलत असल्याचे सांगून तसेच तुम्हाला लॉटरी लागली आहे, विम्याचे पैसे मिळवून देतो, अशी असंख्य कारणे सांगून हॅकर्सनी वर्षभरात तब्बल साडेपाच हजार पुणेकरांच्या बँक खात्यातून कोट्यवधीची रक्कम लंपास केली आहे़ पुणे सायबर गुन्हे शाखेने वर्षभरा ४९ आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे.बँकेतून कोणीही फोन करुन तुमचा पासवर्ड मागत नाही़ कोणालाही बँक खात्याची माहिती देऊ नका, असे बँका तसेच पोलिसांकडून जनजागृती केली जात असते़ तरीही सुरक्षित असलेले पण सायबर साक्षर नसलेले असंख्य लोक हॅकर्सने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून त्यांना आपल्या खात्याची माहिती देतात व त्यानंतर हॅकर्स त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतात़ भारतीय कंपन्यांशी संबंधित असलेले परदेशी व्यापारी कंपन्यांचे ई मेल हॅक करुन परस्पर दोन कंपन्यांमध्ये होत असलेले आर्थिक व्यवहाराबाबत माहिती घेऊन परदेशी व्यापारी कंपन्यांचे फेक ईमेल आयडी बनवून भारतीय कंपन्यांशी ई मेलद्वारे संपर्क साधून दुसऱ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते़ नोकरीसाठी नामंवत कंपन्यांच्या साईटसारखी फेक साईट बनवून त्याद्वारे नोकरीचे आमिष दाखवून तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याचे सर्वाधिक गुन्हे दाखल होत आहे़ पुणे सायबर शाखेकडे आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे वर्षभरात ५ हजार ५०७ अर्ज आले होते़ त्यापैकी ४ हजार २२२ अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६८० प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले़ तर ६०५ अर्ज दप्तरी दाखल केले गेले़ या प्रकरणात ४९ आरोपींना सायबर सेलने अटक केली़ या वर्षभरात सर्वात मोठा सायबर हल्ला कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर करण्यात आला होता. प्रोक्सी सर्व्हर तयार करुन हकर्सनी एकाच वेळी २९ देशातून अडीच हजार क्लोन व्हिसा आणि रुपे कार्डचा वापर करुन तब्बल ९४ कोटी रुपये लंपास करण्यात आले होते़ याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी प्रत्यक्ष पैसे काढणाºया ११ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ६ लाख रुपये जप्त केले आहेत़३०० जणांना मिळाले ४ कोटी १२ लाख परतज्या आॅनलाईन तक्रारीत ओटीपी शेअर केला गेला असेल,तर त्या प्रकरणात बँकेकडून फसवणूक झालेली रक्कम रिफंड केली जात नाही़ अशा प्रकरणात पैसे विविध मर्चंट/ वॉलेटमध्ये पैसे गेले असतात़ सायबर सेलकडून संबंधितांना तातडीन मेलद्वारे पत्रव्यवहार करुन अर्जदारांना रक्कम परत मिळवून दिली जाते़ त्यात प्रामुख्याने नोकरीच्या बहाण्याने, क्रेडीट कार्ड असतानाही फसवणूक झाली़ तसेच कोणतीही बँकेची माहिती शेअर केली नसतानाही त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले, अशा सुमारे ३०० अर्जदारांबाबत सायबर सेलने संबंधित मर्चंट / वॉलेट यांच्याशी संपर्क साधून अर्जदारांना त्यांचे पैसे परत मिळवून दिले़ २०१८ मध्ये सायबर सेलने अशा प्रकारे ४ कोटी १२ लाख ५५ हजार ९०५ रुपये रिफंड मिळवून दिला.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी