शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

चित्रपटनिर्मितीचा भरतो मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:30 IST

डॉ. उज्ज्वल निरगुडकर : ऑस्करमध्ये अभिनव उपक्रम

- नम्रता फडणीस

पुणे : पुरस्कार सोहळ्यांमध्ये नॉमिनेशन मिळाल्यावर आपल्याकडे अशी चर्चा कधीच घडवली जात नाही. मुख्य प्रवाहातील मोठ्या स्टुडिओमध्ये निर्मिती केलेल्या चित्रपटांना संधी मिळते; मात्र ज्या छोट्या चित्रपटांना व्यासपीठ मिळत नाहीत त्यांची दखल आॅस्कर सप्ताहात घेतले जाते. हा ‘आॅस्कर सप्ताह’ खूपच माहितीपर वाटला, अशा भावना आॅस्कर सोहळ्यात अकादमीचे सदस्य म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. उज्ज्वल निरगुडकर यांनी व्यक्त केल्या.

सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९१वा आॅस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्निया येथे नुकताच झाला. आॅस्कर सोहळ्यामध्ये भारताचे प्रतिनिधी डॉ. निरगुडकर यांना आॅस्कर अकादमीचे सदस्य या नात्याने सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते. विशेष म्हणजे, या ‘आॅस्कर सप्ताहा’मध्येदेखील त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल डॉ. उज्ज्वल निरगुडकर यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. आॅस्कर अकादमीच्या या उपक्रमाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. आजपर्यंत भारतात ही गोष्ट कधीच कुठे पाहायला मिळाली नाही. हेच आॅस्करचे वेगळेपण म्हणता येईल. ही संकल्पनाच इतकी वेगळी आणि जगभरातील चित्रपटनिर्मिती प्रक्रि येत सहभागी होणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे... अशा शब्दांत डॉ. निरगुडकर यांनी ‘आॅस्कर पुरस्कार सोहळ्या’च्या या पडद्यामागील उपक्रमाचे कौतुक केले.

ते म्हणाले, ‘‘हा ‘आॅस्कर सप्ताह’ मुख्य पुरस्कार सोहळ्याच्या एक आठवडा पूर्वी आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी ‘डॉक्युमेंट्री, शॉर्ट्स, फॉरेन लेंग्वेज, अ‍ॅनिमेटेड फीचर्स आणि मेकअप अँड हेअर स्टायलिंग हे पाच विभाग आॅस्कर सप्ताहात समाविष्ट करण्यात आले होते.@डॉक्युमेंट्री किंवा शॉर्ट फिल्म विभागामध्ये नॉमिनेशन झालेल्या विविध देशांतील पाच व्यक्तींना त्यांचे क्लिपिंग दाखवून पॅनेलद्वारे त्यांच्याशी चर्चा केली जाते. हे पॅनेल त्या-त्या विभागाचा तज्ज्ञ नियंत्रित करतो. आमंत्रित केलेले अकादमीचे सदस्य आणि नॉमिनी हे त्यामध्ये सहभागी केले जातात. व्यासपीठावर आल्यावर दिग्दर्शकांना हा चित्रपट बनविण्याची कल्पना कशी सुचली? पैसा कसा जमविला? देशात असा चित्रपट बनविताना काही अडचणी आल्या का? हा चित्रपट आॅस्करला नॉमिनेटेड झाला तर देशाला काय फायदा झाला? असे त्यांना विचारले जाते. अशी चर्चा पहिल्यांदाच ऐकायला मिळाली.’’९१ लोकांनी नॉमिनेशन जाहीर होताच आनंदात केले मुंडणएका जर्मन दिग्दर्शकाने पॅनेल चर्चेमध्ये एक गमतीशीर अनुभव सांगितला. आॅस्करचे नॉमिनेशन त्याच्या चित्रपटाला जाहीर झाले. यंदाचे ९१वे वर्ष असल्याने तिथल्या ९१ लोकांनी मुंडण करून डोक्याला सोनेरी रंग फासून त्याची वाजतगाजत मिरवणूक काढली. पण इथे येऊन जेव्हा मी पुतळ्याकडे निरखून पाहिले तर त्यावर थोडेसे केस आहेत असे दिसले. मी म्हटलो उगाच लोकांनी मुंडण केले. अशा रंजक किश्शाची आठवण डॉ. उज्ज्वल निरगुडकर यांनी सांगितली.‘डॉक्युमेंट्री’मधूनही मिळू शकते उत्पन्न२०१८ हे वर्ष ‘डॉक्युमेंट्री’साठी चांगले गेले. नॉमिनेशनसाठी आलेल्या एका डॉक्युमेंट्रीला आतापर्यंत सर्वाधिक १०७ कोटी, तर ६० डॉक्युमेंट्रींना ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. हा नफा कमावणारा व्यवसाय झाला आहे. मात्र, आपल्याकडे लोकांनी डॉक्युमेंट्री बघितली तरी पुष्कळ आहे, अशी भावना आहे. डॉक्युमेंट्रीमधूनदेखील चांगले उत्पन्न मिळू शकते, असा चांगला संदेश यातून मिळाला असल्याचे डॉ. निरगुडकर यांनी स्पष्ट केले.

‘नेटफ्लिक्स’वरच्या चित्रपटांना मुख्य प्रवाहातले चित्रपट म्हणायचे का?’रोमा’ चित्रपटाला नेटफ्लिक्सने आर्थिक सहकार्य केले. चित्रपट म्हणजे चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले चित्रपट, अशी एक धारणा आहे. ते आपण पुरस्कारासाठी ग्राह्य धरतो. मग, ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना मुख्य प्रवाहातले चित्रपट म्हणायचे का? अशा उलटसुलट प्रतिक्रिया समाजमाध्यमातून उमटल्या. हे चित्रपट गाजले तर चित्रपटगृहात लोक जाणे बंद होईल, असा एक मतप्रवाह होता. पण, आॅस्कर अकादमीने नेटफ्लिक्स चित्रपटांचीदेखील दखल घेतली. या अशा चर्चा आॅस्करच्या थिएटरमध्ये होतात याकडे निरगुडकर यांनी लक्ष वेधले.