शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नीरा येथे पर्युषण पर्व उत्साहात, पालखी सोहळाही उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:30 IST

पर्युषण पर्व व षोडशकारण व्रत यांची पालखी डॉ. निरंजन शहा यांच्या घरापासून मंदिरापर्यंत सवाद्य काढण्यात आली. पालखीमागून जोडीने कुंभ घेऊन फिरण्याचा मान नवेंदू शहा व नेहा शहा या उभयतांना मिळाला.

नीरा : येथे पर्युषण पर्व उत्साहात पार पडले. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जैन धर्मामध्ये भाद्रपदामध्ये येणारे पर्युषण पर्व सणांचा राजा म्हणून ओळखला जातो. या दहा दिवसांच्या पर्वात रोज सकाळी भगवंताचा पंचामृत अभिषेक, दुपारी तत्त्वार्थ, संध्याकाळी शास्त्रपठण, आरती, स्पर्धा, प्रश्नमंच आदीचे संयोजन करण्यात आले होते. या पर्वात नीरा येथील अनुजा निरंजन शहा यांनी षोडशकारणाचे सोळा उपवास, सिद्धांत शहा, प्रगती शहा यांनी रत्नत्रांचा तीन उपवास विबुद्धसागरमहाराजांच्या पावन सान्निध्यामध्ये केले.

पर्युषण पर्व व षोडशकारण व्रत यांची पालखी डॉ. निरंजन शहा यांच्या घरापासून मंदिरापर्यंत सवाद्य काढण्यात आली. पालखीमागून जोडीने कुंभ घेऊन फिरण्याचा मान नवेंदू शहा व नेहा शहा या उभयतांना मिळाला. यावेळी मंदिरात विविध बोली होऊन भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी विबुद्धसागरमहाराजांचा ६३ वा जन्मदिवस, ११ वा एलाचार्य दिवस, तसेच आचार्य पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वस्त मनोज शहा यांनी प्रस्तावना करून धार्मिक कार्य करीत असताना कोणी दुखावले असेल तर त्याबद्दल क्षमापना केली. जैन धर्मात क्षमेला फार महत्त्व आहे. कुंथुसागरमहाराज यांनी विबुद्धसागरमहाराज यांना आचार्यपद घोषित केले. त्या पत्राचे वाचन रमणिकलाल कोठडिया यांनी केले.अनुजा निरंजन शहा यांनी षोडशकारण व्रत केल्याप्रीत्यर्थ डॉ. निरंजन शहा यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी प्रद्युम्नकुमार व्होरा, निष्कलंक शहा, अरविंद शहा, नीरज शहा, डॉ. नीना शहा, रेणुका कोठडिया, तनुजा शहा, सुजाता शहा, वैशाली गांधी आदी जैनबांधव उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेJain Templeजैन मंदीर