शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेथी, कोथिंबीर 2 ते 4 रुपये जुडी, रविवारी मार्केट यार्डमध्ये उच्चांकी आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 22:19 IST

पुणे: सध्याच्या वातावरण पालेभाज्यांच्या उत्पन्नासाठी अत्यंत पोषक असल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक झाली.

पुणे: सध्याच्या वातावरण पालेभाज्यांच्या उत्पन्नासाठी अत्यंत पोषक असल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक झाली. यामध्ये कोथिंबीर आणि मेथीची तर प्रत्येकी दोन ते अडीच लाख जुडी आवक झाल्याने दर प्रचंड कोसळले. चार पैसे जास्त मिळण्याच्या अपेक्षाने पुणे जिल्ह्यासह जळगाव, अमरावती भागातून शेतक-यांनी पुण्यातील मार्केट यार्डात कोथिंबीर, मेथी विक्रीसाठी आणली. परंतु दर कोसळल्याने शेतक-यांना मातीमोल किंमतीला भाजी द्यावी लागली. यामुळे गाडीभाडे देखील सुटेल नसल्याची प्रतिक्रिया काही शेतक-यांनी दिली.राज्यात दिवाळीपूर्वी सर्वच भागात झालेल्या धुवाधार परतीच्या पावसामुळे पालेभाज्या व फळभाज्याचे प्रचंड नुकसान झाले. सलग आठ ते दहा दिवस मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे त्यानंतर भाजीपाल्याचे दर वाढतच गेले. दिवळीनंतर हे दर मोठ्या प्रमाणात कडाडले होते. वीस दिवसांपूर्वी कोथिंबीरीचे दर तर ४० ते ५० रुपयांच्या पुढे गेले होते. तर मेथीच्या भाजीची जुडी १५ ते २५ रुपयांनी विक्री केली गेली. परंतु आता मार्केट यार्डमध्ये पालेभाज्या व फळभाज्याची आवक नियमित सुरु झाली आहे. हिवाळा भाजीपाल्याच्या उत्पन्नासाठी चांगला हंगाम मानला जातो.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथील तरकारी विभागात कोथींबीरीची दोन लाख २५ हजार गड्डी आवक स्थानिक परिसरातून झाली आहे़ मेथीची १ लाख ७५ हजार जुडींची आवक झाली. आवक वाढल्याने मेथी, कोथिंबीरचे दर पडले असल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.पालेभाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्यातपालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे सर्व पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली असून, भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. कांदापात आणि करडईच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत शेकडा गड्डीमागे प्रत्येकी ४०० रुपये, तर चवळईच्या भावात ३०० रुपये, कोथिंबीर आणि हरभरा गड्डीच्या भावात प्रत्येकी २०० रुपयांनी घट झाली आहे. घाऊक बाजारात कोथिंबीर आणि मेथीच्या जुडीला २ ते ४ रुपये मोजावे लागत आहेत. तर किरकोळ बाजारात १० रुपये भावाने जुडीची विक्री होत आहे. आवक घटल्याने केवळ चवळईच्या भावात मात्र शेकडा जुडीमागे घाऊक बाजारात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे उतरलेले भाव कायम आहेत. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहिल, असा अंदाज भुजबळ यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Puneपुणे